पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या कतार दौऱ्यार भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी टीका केली आहे. मोदी यांनी या दौऱ्यात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याला सोबत न्यायला हवे होते. कतारमध्ये शिक्षा ठोठावलेल्या भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठीच्या कुटनितीत केंद्र सरकार अपयशी ठरले होते. अखेर पंतप्रधानांनी शाहरुख खान याला हस्तक्षेप करण्याची विनंती केली. ज्यामुळे या अधिकाऱ्यांची सुटका झाली, असा दावा स्वामी यांनी केला आहे. स्वामी यांच्या दाव्यामुळे केंद्र सरकार घेत असलेल्या श्रेयवादावर पाणी फिरले असून, उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
'MEA आणि NSA पूर्णपणे अपयशी'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक्स पोस्टला प्रतिसाद देत लिहीलेल्या पोष्टमध्ये सुब्रह्मण्यम स्वामी यांनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे की, 'कतारच्या शेखांचे मन वळविण्यात MEA आणि NSA पूर्णपणे अपयशी ठरले. त्यामुळे मोदींनी सिनेस्टार शाहरुख खान याला हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यानंतर आमच्या भारतीय नौदल अधिकाऱ्यांना मुक्त करण्यासाठी शेखांसोबत महागडा तोडगा निघाला. त्यामुळे मोदींनी शाहरुखला आपल्या दौऱ्यात कतारला न्यावे.' (हेही वाच, Qatar Frees Indian Navy Veterans: कतारच्या तुरुंगात असलेल्या 8 भारतीय माजी नौदल जवानांची सुटका, 7 जण मायदेशी परतले, कथित हेरगिरी प्रकरण)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स हँडलवर म्हटले आहे की, पुढील दोन दिवसांत, मी विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी UAE आणि कतारला भेट देणार आहे. ज्यामुळे या राष्ट्रांसोबतचे भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील. पदभार स्वीकारल्यापासून UAE चा हा माझा माझा दौरा असेल. जो भारत-यूएई मैत्रीला आम्ही दिलेला प्राधान्यक्रम दर्शवितो. मी माझा भाऊ मोहम्मद बिन झायेद यांना भेटण्यास उत्सुक आहे. मला UAE मधील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करण्याचा मान मिळेल. अबू धाबी येथील एका सामुदायिक कार्यक्रमात मी भारतीय समुदायाला संबोधित करेन.
एक्स पोस्ट
Modi should take Cinema star Sharuk Khan to Qatar with him since after MEA and NSA had failed to persuade the Shiekhs of Qatar, Modi pleaded with Khan to intervene , and thus got an expensive settlement from the Qatar Shiekhs to free our Naval officers.
— Subramanian Swamy (@Swamy39) February 13, 2024
काय आहे प्रकरण?
अल दाहरासोबत काम करणाऱ्या भारतीय नागरिकांना ऑगस्ट 2022 मध्ये हेरगिरीच्या कथित प्रकरणात अटक करण्यात आली होती. या सर्वांवर हेरगिरीचा आरोप होता. मात्र, या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता कतारी अधिकाऱ्यांनी किंवा नवी दिल्ली या दोघांनीही भारतीय नागरिकांवरील आरोप सार्वजनिक केले नाहीत. 26 ऑक्टोबर 2023 रोजी नौदलाच्या अधिकाऱ्यांना कतारच्या कोर्ट ऑफ फर्स्ट इन्स्टन्सने फाशीची शिक्षा सुनावली. भारताकडून या निर्णयाचे वर्णन "खूपच" धक्कादायक असे करण्यात आले होते. या निर्णयाबाबत आपण कतार सरकारकडे दाद मागू असेही भरत सरकारने म्हटले होते. या प्रकरणाला आपण सर्वोच्च प्राधान्य देत आहोत. या प्रकरणात कायदेशीर पर्यायांचा आम्ही विचार करु असेही भारत सरकारने म्हटले होते.