Sri Lanka National Cricket Team vs Australia National Cricket Team ODI Stats: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (SL vs AUS) यांच्यातील दोन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 12 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल. एकदिवसीय मालिकेसाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. श्रीलंकेचे नेतृत्व चारिथ अस्लंका करत आहे. तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथ करत आहे. यापूर्वी दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली होती. कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने 2-0 ने जिंकली. मात्र, आता दोन्ही संघांचे लक्ष एकदिवसीय मालिकेवर असेल. (Sri Lanka vs Australia 1st ODI 2025 Live Streaming: पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणार जोरदार स्पर्धा, लाईव्ह सामना कसा पहाल?)
दोन्ही संघांमधील हेड टू हेड रेकॉर्ड
श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया संघ एकदिवसीय सामन्यांमध्ये 104 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा दिसतो. ऑस्ट्रेलियाने 104 पैकी 64 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेने 36 सामने जिंकले आहेत. याशिवाय, 4 सामने अनिर्णीत राहिले. यावरून ऑस्ट्रेलियन संघ अधिक मजबूत असल्याचे दिसून येते. पण श्रीलंकेला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळू शकतो.
श्रीलंका-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्यांमध्ये श्रीलंकेचा कुमार संगकाराने सर्वाधिक धावा केल्या आहेत. कुमार संगकाराने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 43 सामन्यांत 59.29 च्या सरासरीने 1675 धावा केल्या आहेत. या काळात कुमार संगकाराने 2 शतके आणि 10 अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय, कुमार संगकाराचा सर्वोत्तम स्कोअर 104 धावा आहे.
श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
कुमार संगकारा (श्रीलंका) - 1675
रिकी थॉमस पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया) - 1649
महेला डी सिल्वा जयवर्धने (श्रीलंका) – 1629
अॅडम क्रेग गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया) - 1511
पिन्नाडुवागे अरविंदा डी सिल्वा (श्रीलंका) - 1451
श्रीलंका-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज
श्रीलंकेचा लसिथ मलिंगाने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. लसिथ मलिंगाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 28 सामन्यांमध्ये 25.41 च्या सरासरीने आणि 5.01 च्या इकॉनॉमीने 48 विकेट्स घेतल्या आहेत.
श्रीलंका-ऑस्ट्रेलियामधील एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
लसिथ मलिंगा (श्रीलंका) - 48
मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) - 48
चामिंडा वास (श्रीलंका) - 49
ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया) - 38
ग्लेन डोनाल्ड मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) - 36
दोन्ही संघांचे खेळाडू
श्रीलंका: पथुम निस्सांका, कामिंदू मेंडिस, कुसल मेंडिस, असिता फर्नांडो, लाहिरू कुमारा, चरिथ असलंका (कर्णधार), अविष्का फर्नांडो, नुवानिंदू फर्नांडो, झेनिथ लियानागे, दुनिथ वेलागे, वानिंदू हसरंगा, मोहम्मद शिराज, इशान मलिंगा, महेश थीकशाना, जेफ्री वँडरसे, निशान मदुष्का.
ऑस्ट्रेलिया: स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, मिचेल स्टार्क, कूपर कॉनोली, शॉन अॅबॉट, बेन द्वारशीस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, स्पेन्सर जॉन्सन, आरोन हार्डी, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, अॅडम झांपा.