Photo Credit- X

Special Leave For Assam Government Employees: आसाम सरकारने(Assam Government) आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या आई-वडील किंवा सासऱ्यांसोबत वेळ घालवण्यासाठी नोव्हेंबरमध्ये दोन दिवसांची विशेष प्रासंगिक रजा (Special Leave)जाहीर केली आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) आज सांगितले.आदेशात म्हटले आहे की, 'सुट्टीचा वापर केवळ वृद्ध आई-वडील किंवा सासरे यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी त्यांचा सन्मान, आदर आणि काळजी घेण्यासाठी केला पाहिजे, वैयक्तिक आनंदासाठी नाही'. विशेष पने वैयक्तिक आनंदासाठी या सुट्टया वापरता येणार नाहीत आणि ज्यांचे आई-वडील किंवा सासरे नसतील ते सुट्ट्यांसाठी पात्र नसतील, असेही त्यात नमूद केले आहे.

 

मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की, 'मुख्यमंत्री डॉ हिमंतबिस्वा यांच्या नेतृत्वाखाली आसाम सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 6 आणि 8 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांच्या आई-वडील किंवा सासऱ्यांसोबत वेळ घालवण्यासाठी विशेष प्रासंगिक रजा जाहीर केली आहे.' X वरील पोस्टमध्ये लिहिले आहे.

त्यात म्हटले आहे की, सुट्टीचा वापर 'केवळ वृद्ध आई-वडील किंवा सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालवण्यासाठी त्यांचा सन्मान, आदर आणि काळजी घेण्यासाठी केला पाहिजे, वैयक्तिक आनंदासाठी नाही.' 7 नोव्हेंबरला छट पूजेची सुट्टी, 9 नोव्हेंबरला दुसऱ्या शनिवारची सुट्टी आणि 10 नोव्हेंबरला रविवारी सुट्टी मिळू शकते, असे सीएमओने सांगितले. त्यात म्हटले आहे की अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी टप्प्याटप्प्याने याचा लाभ घेऊ शकतात आणि ज्यांचे आई-वडील किंवा सासरे नाहीत त्यांना याचा लाभ मिळणार नाही.

2021 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यांच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आई-वडील आणि सासऱ्यांसोबत वेळ घालवण्यासाठी दोन विशेष प्रासंगिक रजे जाहीर केली होती.