पी. चिदंबरम आणि कार्ती चिदंबरम यांना तूर्तास दिलास; विशेष न्यायालयाकडून जामीन मंजूर
P. Chidambaram (Photo Credits: PTI/File)

आयएनएक्‍स मीडिया प्रकरणात (INX Media Case) दिल्ली उच्च न्यायालयाकडून पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांना अटकपूर्व जामीन अर्ज नाकारण्यात आला होता. त्यानंतर आज त्यांनी या अर्जाविरोधात सर्वोच्च कोर्टात धाव घेतली. मात्र सुप्रीम कोर्टानेही त्यांना दणका देत त्यांचा जमीन अर्ज फेटाळला होता. अखेर विशेष न्यायालयाने (Special CBI Court) पी. चिदंबरम आणि त्याचा मुलगा कार्ती चिदंबरम (Karti Chidambaram) यांचा ईडी आणि सीबीआय या दोन्ही प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पी. चिदंबरम आयएनएक्स मीडिया प्रकरणात आधीपासूनच सीबीआयच्या ताब्यात आहेत.

आरोपीला अटक करून त्याची चौकशी करण्याच्या ईडीच्या दाव्याशी सहमत असल्याचे खंडपीठाने म्हटले होता. यासाठी चिदंबरम जमीन अर्ज नाकारला गेला होता. हे प्रकरण फार गंभीर आहे. यामध्ये अनेक आर्थिक व्यवहारांची गुंतागुंत आहेत त्यामुळे ते वेगळ्या पद्धतीने हाताळायला हवे असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. त्यात पी. चिदंबरम यांचा सीबीआय कोठडीचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे त्यांनी ताबडतोब विशेष न्यालयात धाव घेतली. अखेर विशेष न्यायालयाने पी. चिदंबरम आणि कार्ती चिदंबरम यांचा जमीन अर्ज मंजूर केला आहे. (हेही वाचा: पी चिदंबरम यांना अटक झाली ते INX मीडिया प्रकरण नक्की आहे तरी काय? जाणून घ्या घटनाक्रम)

दरम्यान, संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या आयएनएक्स मीडिया प्रकरणात अखेर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अटक झाली होती. तब्बल 27 तासांच्या नाट्यमय घटनांनंतर सीबीआय ने (CBI) चिदंबरम यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर चिदंबरम हे बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली होती/.