खेळांची (Sports), गाण्याची (Music), नृत्याची (Dance), पाककलेची (Cooking) अशा विविध स्पर्धेबाबत तुम्ही नक्कीचं ऐकलं असाल. पण झोपण्याच्या स्पर्धेबाबत (Sleeping Competition) तुम्ही कधी ऐकलं आहे का? तर हो, तुमची झोप ही देखील कला आहे आणि झोप घेणाऱ्या झोपाळूसाठी ही स्पर्धा एक सुवर्णसंधी असु शकते. Wakefit.co द्वारे एका इंटर्नशिप कार्यक्रम (Internship Program) घेण्यात आला होता. यात या सीझनमध्ये सलग 100 दिवसात 9 तास झोपलेल्या स्पर्धकास तब्बल 5 लाखांचं बक्षिस दिल्या जाणार होत. या स्लीपिंग स्पर्धेत (Sleeping Competition) सुमारे 4.5 लाख लोकांनी भाग घेतला होता. स्पर्धेदरम्यान झोपेचा कालावधी (sleeping Timing), जागे होण्याची वेळ, हलकी झोप आणि गाढ झोप या पॅरामीटर्सवर (Parameters) स्पर्धकांचे परीक्षण करण्यात आले. झोप ही महत्वाची असून त्याबाबत जागरुकता पसरवण्यासाठी 100 दिवसांचा कार्यक्रम राबविण्यात आला.
तरी या स्पर्धेत कोलकात्याची (Kolkata) 26 वर्षीय तरूणी त्रिपर्णा चक्रवर्ती (Triparna Chakraborty) तिच्या गाढ झोपण्याच्या स्पर्धेत विजय पटकावला. एवढचं नाही तर तिच्या या झोपाळू तिला कौशल्यासाठी 5 लाख रुपयांचं बक्षिस देखील मिळालं आहे. तसेच या स्पर्धेत तिला 'इंडियाज फर्स्ट स्लीप चॅम्पियन' (India's First Sleep Champion) किताब जिंकल्यामुळे तिला मुकूट प्रदान करण्यात आला आहे. स्लीपिंग स्पर्धेत (Sleeping Competition) सुमारे 4.5 लाख लोकांनी भाग घेतला आणि त्रिपर्णा चक्रवर्ती (Triparna Chakraborty) या सर्वांना पराभूत करून विजेती ठरली. (हे ही वाचा:- SBI: पठ्ठ्याने थेट SBI बॅंक विरोधात तक्रार करत मिळवले 85 हजार, घडलेला प्रकार ऐकून तुम्हीही व्हाल थक्क)
View this post on Instagram
लोकांचा या स्पर्धेला उत्सफूर्त प्रतिसाद बघता आता Wakefit.co ने या स्पर्धेचा पुढील सिझन (Season) लॉन्च (Launch) केला आहे. म्हणजे आता आणखी कुणाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास तो सहज Wakefit.co च्या अधिकृत वेबसाईटवर (Official Website) हजेरी लावत या स्पर्धेसाठी नोंदणी करु शकतो. तसेच या सिझनमध्ये ही स्पर्धा जिकणाऱ्यास तब्बल 10 लाखांचं बक्षीस देण्यात येणार आहे.