Mobile Phone Representational Image (Photo Credits: Pixabay)

Farrukhabad, Sep 20: उत्तर प्रदेश येथील धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हिडीओ रील बनवण्यापासून रोखल्याने  एका तरुणीने तिच्या दोन लहान भावांचा खून करण्याचा प्रयत्न केला आहे. धक्कादायक प्रकार घडल्यानंतर तरुणीच्या भावांनी पोलिसात तक्रार दाखल केली. परंतु तरुणीला ताब्यात घेतल्यानंतर तिने महिला कॉन्स्टेबलला मारहाण केली, त्यांचा गणवेश फाडला आणि स्टेशन प्रभारींसोबत गैरवर्तन केले. पोलिसांनी सांगितले की, आकाश राजपूत आणि जयकिशन राजपूत यांनी त्यांची मोठी बहीण आरती हिच्या विरुद्ध फर्रुखाबादच्या मौ दरवाजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आकाशने सांगितले की, बहीण आरतीला रील बनवून इन्स्टाग्रामवर अपलोड करण्याचे व्यसन होते. तथापि, आजकाल त्याची बहीण काहीपण व्हिडिओ पोस्ट करत होती.

परिस्थिती अशी आली की, मित्र त्याला टोमणे मारायला लागले आणि त्याची आणि त्याच्या बहिणीची चेष्टा करू लागले. जेव्हा त्याने त्याच्या बहिणीला विरोध केला तेव्हा तिने त्याच्यावर क्रूरपणे हल्लाच केला आणि त्याचा गळा दाबून खून करण्याचाही प्रयत्न केला. त्याचा भाऊ जयकिशन त्याच्या बचावासाठी आला तेव्हा तिने त्याला सोडले नाही आणि त्याच्यावरही हल्ला केला.

आकाशने सांगितले की, बहीण अनेकवेळा त्यांचे वडील बदम सिंग यांच्यासोबतही विचित्र वागते. तक्रार मिळाल्यानंतर स्टेशन प्रभारी अमोद कुमार सिंह यांनी आरतीला पोलिस ठाण्यात आणण्यासाठी महिला कॉन्स्टेबल आणि होमगार्डला पाठवले. पोलिस स्टेशनमध्येही तिने हायव्होल्टेज ड्रामा केला आणि तिथे तिचा भाऊ आकाशला पाहून तिने त्याच्यावर पुन्हा हल्ला केला.

महिला हवालदारांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला असता तिने त्यांना मारहाणही केली. निरीक्षक अमोद कुमार सिंह यांनी सांगितले की, आरतीवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. "एक कलम ३०७ अंतर्गत (हत्येचा प्रयत्न) आणि दुसरा महिला कॉन्स्टेबलला मारहाण करणे, गणवेश फाडणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे. आरतीला तुरुंगात पाठवण्यात आले आहे," सिंग पुढे म्हणाले.