Share Market (Photo Credits-ANI)

Share Market Holiday: उद्या, 19 फेब्रुवारी रोजी देशभरात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची जयंती साजरी होत आहे. विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा होतो. राज्य सरकारकडून 19 फेब्रुवारी रोजी अधिकृतरीत्या सार्वजनिक सुटी (Holiday) जाहीर करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील बँका 19 फेब्रुवारी 2025 (बुधवार) रोजी बंद राहणार आहेत. मात्र आता अनेक गुंतवणूकदारांच्या मनात प्रश्न आहे की, या दिवशी (19 फेब्रुवारी) शेअर बाजार (Share Market) खुला राहील की नाही?. तर गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बाब म्हणजे, या दिवशी शेअर बाजार नेहमीप्रमाणे खुले राहील.

एनएसईने (NSE) जाहीर केलेल्या शेअर बाजार सुट्टीच्या यादीनुसार, राष्ट्रीय शेअर बाजार आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) दोन्ही नेहमीप्रमाणे कार्यरत आहेत. याचा अर्थ, 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दोन्ही शेअर बाजारांमध्ये व्यवहार होतील. एनएसई आणि बीएसई दोन्ही त्यांच्या नियोजित वेळेनुसार, म्हणजे सकाळी 9.15 ते दुपारी 3.30 पर्यंत व्यवहारासाठी खुले राहतील. (हेही वाचा: Bank Holiday on February 19: छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बँकांना सुट्टी; फेब्रुवारी महिन्यातील बँक हॉलीडे घ्या जाणून)

याशिवाय, गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवावे की 16 फेब्रुवारी 2025 रोजी खरेदी केलेले स्टॉक 19 फेब्रुवारी रोजी विकता येणार नाहीत. हा बदल केवळ 19 फेब्रुवारी रोजी सेटलमेंट हॉलिडे असल्याने करण्यात आला आहे, जेणेकरून स्टॉकचे दुप्पट पेमेंट किंवा इतर आर्थिक प्रक्रियांमध्ये कोणतीही गैरसोय टाळता येईल. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सर्व बँका बंद राहतील. मात्र ही सुट्टी फक्त महाराष्ट्रात लागू असेल, देशातील इतर राज्यांमध्ये बँका खुल्या राहतील.