शेअर मार्केट (फोटो सौजन्य- फेसबुक)

चीन (China) मधून पुढे जात आता जगभराला विळखा घालू पाहणाऱ्या कोरोना व्हायरसचा (Corona Virus)  गंभीर परिणाम हा शेअर बाजारावर (Share Market) दिसून येत आहे, आज, 28 फेब्रुवारी रोजी सलग सहाव्या दिवशी शेअर मार्केट मध्ये मोठी पडझड दिसून आली, आज सकाळी शेअर मार्केट सुरु होताच सेन्सेक्स (Sensex) मध्ये 1,155.16 पॉइंट्सची घसरण झाली आहे, त्यामुळे दिवसाच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स 38,590.50 वर पोहचला आहे. तर दुसरीकडे निफ्टी (Nifty) मध्ये सुद्धा निच्चांक दर पाहायला मिळत आहे, मागील वेळेच्या तुलनेत 346.8 पॉइंट्सची अधिक पडझड होऊन आता निफ्टी 11,286.50 वर पोहचले आहे. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयांची किंमत सुद्धा -0. 14  पॉईंटने खाली आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, बँकिंग, ऑटोमोबाईल, धातू आणि तेल आणि गॅस या बाजारात सर्वाधिक फटका बसून सलग सहाव्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली.टाटा स्टील, टाटा महिंद्रा, बजाज फायनान्स, इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा आणि ओएनजीसी या कंपन्यांचे समभाग 5. 31 टक्क्यां पर्यंत पडले आहेत. 1 एप्रिल पासून ATM मधून 2000 च्या नोटा गायब होणार? निर्मला सीतारामन यांनी केला खुलासा

ANI  ट्वीट

दरम्यान, चीन मध्ये वाढत चाललेल्या कोरोना व्हायरसचे आता साउथ कोरिया, इटली आणि मध्ये आशिया येथे कोरोनाचे संक्रमण झाले आहे. साहजिकच यामुळे आशियाई मार्केट मध्ये याचा गंभीर परिणाम होत आहे, सध्या जगभरात करोना विषाणूग्रस्तांची संख्या तब्बल 81 हजार झाली आहे. या व्हायरसच्या भीतीमुळे भारतात चीनच्या वस्तूंची आयात थांबवण्यात आली आहे, या परिस्थितीत मध्यंतरी दिल्ली निवडणुकांच्या वेळी बरीच सुधारणा झाली होती, मात्र त्यानंतर आता मागील सहा दिवसांपासून सेन्सेक्स मध्ये पडझड कायम आहे.