Shaktikanta Das on Inflection in India: भारतीय अर्थव्यवस्थेत सतत नकारात्मक वातावरण पहायला मिळत आहे. एफआयआय (FII) देश सोडून जात आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शेअर बाजारातही (Share Market) मोठी घसरण पाहायला मिळत आहे. महागाईचे आकडेही वरच्या दिशेने जात आहेत. मात्र, महागाई नियंत्रणात आणता येईल, असा विश्वास आरबीआयचे गव्हर्नर (RBI Governor) शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांना आहे. ते म्हणाले की, जगात अनेक समस्या सुरू असल्याने महागाईवर दबाव आहे. पण, देशातील महागाई आणि वाढ यांच्यात ताळमेळ आहे. भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) मजबूत स्थितीत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीपर्यंत महागाई नियंत्रणात राहील. (हेही वाचा - Latest Post Office Schemes Interest Rates: केंद्र सरकारने जाहीर केले PPF, SCSS, SSY, इतर लहान बचत योजनांचे व्याजदर; पुढील 3 महिन्यांत एवढी होईल कमाई )
चलनविषयक धोरण समितीचे वाढत्या महागाईवर लक्ष
शक्तिकांता दास यांच्या मते, हवामानातील अनिश्चितता आणि भू-राजकीय समस्यांमुळे महागाईचा आकडा आमच्या लक्ष्याच्या 4 टक्क्यांच्या वर गेला आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत यामध्ये सुधारणा होईल. मुंबईत आयोजित मॅक्रो वीक 2024 ला संबोधित करताना ते म्हणाले की भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिरता आणि ताकद यामुळे चलनविषयक धोरण समितीला व्याजदरांव्यतिरिक्त महागाईवर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळाली आहे. कोविड 19 चे दुष्परिणाम असूनही, आम्ही गेल्या तीन आर्थिक वर्षांमध्ये सुमारे 8 टक्के आर्थिक विकास दर राखला आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्येही ते सुमारे 7.2 टक्के राहण्याची अपेक्षा आहे.
IMF जागतिक बँक आर्थिक संकटाबाबत सावध
आरबीआय गव्हर्नर म्हणाले की देशांतर्गत मागणी वाढत आहे. याशिवाय देशात उत्पादनही वाढत आहे. देशात खासगी गुंतवणूकही वाढत आहे. सरकारने भांडवली खर्च वाढवणे आणि बँकांचे आर्थिक आरोग्य मजबूत ठेवण्यावर भर दिला आहे. NBFC देखील चांगली कामगिरी करत आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रही गुंतवणूक वाढवून देशाच्या प्रगतीला हातभार लावत आहे. कृषी क्षेत्रातील विकासामुळे ग्रामीण भागातही मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँक जगात उद्भवलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी एकत्र काम करत आहेत.