Sex Survey in India: भारतातील 82% स्त्रिया पतीला सेक्ससाठी नकार देऊ शकतात; 66% पुरुषांना याबाबत कोणतीही समस्या नाही
प्रतीकात्मक फोटो (File Image)

गेल्या आठवड्यात समोर आलेल्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NHFS) मध्ये भारतीय जोडप्यांच्या लैंगिक संबंधांबाबत (Sex) अनेक खुलासे करण्यात आले आहेत. या सर्वेक्षणात असे म्हटले आहे की 82% भारतीय स्त्रिया त्यांच्या पतींना सेक्ससाठी  नाही म्हणू शकतात. या सर्वेक्षणानुसार लक्षद्वीपमधील बहुतांश महिला त्यांच्या निवडीबाबत आवाज उठवत आहेत. त्याच वेळी, लडाख आणि जम्मू-काश्मीरमधील महिला नाही म्हणण्यास सर्वात जास्त संकोच करतात. तेथे, केवळ 60% आणि 65% स्त्रिया थकल्या किंवा बरे वाटत नसताना सेक्स करण्यास नकार देतात.

देशात तुलनेने मागास समजल्या जाणाऱ्या बिहार आणि उत्तर प्रदेशातील महिलांनीही शारीरिक संबंधांच्या बाबतीत 'नको असल्यास नवऱ्याला नाही म्हणणे’ अशी भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. बिहारमधील 81% पेक्षा जास्त महिलांनी सेक्स या विषयावर उघडपणे आपली म्हणणे व्यक्त केले आहे, तर उत्तर प्रदेशातील 83% महिलांनी नकार देण्याबद्दल भाष्य केले.

भारतातील ईशान्येकडील राज्यांबद्दल बोलायचे झाले तर, हे सर्वेक्षण थेट नमूद करते की, या राज्यांतील महिला सेक्सबाबत त्यांची संमती आणि असहमतीबाबत अगदी स्पष्ट आहेत. मेघालय (सुमारे 74%) आणि सिक्कीम (सुमारे 78%) वगळता बहुतांश राज्यांमधील 80% पेक्षा जास्त महिलांनी उघडपणे 'नकार' नोंदवला आहे. या प्रकरणात मिझोराम अव्वल आहे जिथे 93% महिलांनी सेक्सबाबत आपले मत स्पष्टपणे मांडले.

देशाची राजधानी दिल्ली, जी महिलांच्या हक्कांच्या अनेक बाबींचे केंद्रबिंदू आहे, तिथेही महिला आपला नकार किंवा होकारावर ठाम आहेत. दिल्लीतील 88 टक्के महिला सेक्ससाठी नाही म्हणून शकतात. तर पंजाबमध्ये केवळ 73 टक्के आणि हरियाणातील 84 टक्के महिला याबाबत उघडपणे बोलू शकतात. पंजाबमधील पुरुषांबाबतही एक चिंताजनक माहिती समोर आली आहे, जिथे पत्नीने सेक्ससाठी नाही म्हटल्यावरही दर दहापैकी सहा पुरुष आपल्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवण्यावर विश्वास ठेवतात. (हेही वाचा: Madhya Pradesh: लोड शेडींगचा फटका! लग्नात वीज गेल्याने वधूंची झाली अदलाबदल, भलत्याच पुरुषांशी लावले लग्न)

यासह, 66 टक्के पुरुष मानतात की पत्नीने सेक्ससाठी नकार देणे योग्य आहे. परंतु अजूनही मोठ्या संख्येने लोक मानतात की महिला लग्नानंतर सेक्स नाकारू शकत नाहीत. सर्वेक्षणातील सहभागी 15 ते 49 वयोगटातील होते. याच सर्वेक्षणातून हे देखील समोर आले आहे की 45 टक्के महिला आणि 44 टक्के पुरुषांचा असा विश्वास आहे की पतीने पत्नीला मारहाण करणे योग्य आहे.