देशात लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) बिगुल वाजले आहे. राजकीय पक्षांचे दिग्गज नेते प्रचारात व्यस्त आहेत. काही जाहीर सभा घेत आहेत, तर काही रोड शो करत आहेत. मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोदरम्यान (PM Modi Road Show) अपघात घडला आहे. रस्त्याच्या कडेला स्वागतासाठी उभं केलेलं स्टेज कोसळल्याने दहापेक्षा जास्त लोक जखमी झाल्याचं सांगितलं जातंय. जखमींमध्ये महिला, पत्रकार आणि लहान मुलांचा समावेश आहे.  याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.  (हेही वाचा - Loksabha Election 2024: वायएस जगन मोहन रेड्डी यांना निवडणूक आयोगाची नोटीस, 48 तासांच्या आत त्यांची भूमिका मांडण्याचे आदेश)

पाहा पोस्ट -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जबलपूरमध्ये झालेल्या रोड शोचे फोटो आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केले आहेत. ते म्हणतात, आज जबलपूरमध्ये रोड शो संपन्न झाला. येथील माझ्या कुटुंबियांचा उत्साह आणि जल्लोष पाहुन माझ्या तिसऱ्या टर्मला आशीर्वाद मिळतील, हे निश्चित आहे. इन्फ्रास्ट्रक्चर आणि रस्त्यांसह येथे आम्ही काम उभं केलं आहे. त्यामुळे जबलपूरच्या विकासाला चालना मिळाली.

आज जबलपुर में रोड शो बेहद शानदार रहा! यहां के मेरे परिवारजनों का जोश और जुनून ये बता रहा है कि हमें तीसरे कार्यकाल का आशीर्वाद मिलने जा रहा है। बेहतर इंफ्रास्ट्रक्चर और सड़कों के साथ-साथ हमने यहां हर क्षेत्र में अभूतपूर्व कार्य किए हैं। इससे जबलपुर के विकास को नए पंख लगे हैं। pic.twitter.com/fwdWfYoaUZ

— Narendra Modi (@narendramodi) April 7, 2024

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच जबलपूर दौरा आहे. त्यांनी जबलपूर भाजपचे उमेदवार आशिष दुबे यांच्यासाठी मते मागितली.