मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण, 2342 अंकांनी घसरला सेन्सेक्स; कोरोना व्हायरस, Yes Bank आर्थिक संकंटाचा परिणाम
Sensex (Photo credits: PTI)

कोरोना व्हायरसची वाढती दहशत आणि येस बॅंकेची आर्थिक स्थिती यामुळे आज मुंबई शेअर बाजाराला मोठा फटका बसला आहे. दरम्यान आज सकाळी 1100 पेक्षा अधिक अंकांच्या घसरणीनंतर आता सेंसेक्स 2000 पेक्षा अधिक अंकांनी घसरला आहे. दरम्यान भारतामध्ये कोरोनाचे 43 रूग्ण आहेत तर जगात 3800 पेक्षा जास्त लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दुसरीकडे आरबीआयने येस बॅंकेवर आर्थिक निर्बंध घातल्याने अनेक डिपॉझिटर्स चिंतेमध्ये आहेत. सोबतच तेलाच्या किंमतींमध्ये वाढ होत असल्याने त्याचा फटका मुंबई शेअर बाजराला बसला आहे. देशाची आर्थिक स्थिती बिकट अवस्थेमध्ये असल्याने अनेकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय केला आहे. त्यामुळे सोनंदेखील आता प्रतितोळे 45 हजारच्या उंबरठ्यावर आहे. तर परिस्थिती अशीच राहिल्यास सोनं 50 हजराचा टप्पा पार करेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सेनेक्समध्ये घसरण झाल्याने आता तो 35 हजारांच्या आसपास आला आहे. तर निफ्टीमध्येही घसरण झाली आहे. आज दुपारी 1.20 च्या सुमारास सेन्सेक्स 2170.29 अंकांनी खाली म्हणजे 6% खाली आल्याने 35,406.33 वर होता. तर निफ्टीमध्ये 628 अंकांनी घसरण होत तो 5.72% खाली आल्याने अंदाजे 10,361.25 च्या आसपास आली होती. दरम्यान एकाच दिवसातील इतकी मोठी घसरण 9 नोव्हेंबर 2016 नंतर पहायला मिळाली आहे. Coronavirus Outbreak In India: भारतामध्ये कोरोना व्हायरसग्रस्त रूग्णांची संख्या 43 वर दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू-कश्मीर मध्ये आढळले नवे रूग्ण.

ANI Tweet

आज सकाळी 9.16 च्या सुमारास सेंसेक्स 1164.38 अंकांच्या (3.10%) घसरणीसह म्हणजे 36411.24 वर उघडला होता. निफ्टी 326.60 अंकांच्या (2.97%) अंकांनी घसरत 10662.90 वर उघडला होता. दरम्यान आज सकाळी 520 शेअर्समध्ये घसरण पहायला मिळाली आहे. येस बॅंकेवर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून निर्बंध घालण्यात आल्याने 3 एप्रिल 2020 पर्यंत कमाल 50,000 रूपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे.