आज आठवड्याच्या सुरूवातीला म्हणजे सोमवार (9 मार्च) दिवशी कोरोना वायरस आणि येस बॅंकेमुळे भारतीय शेअर बाजाराची सुरूवात निराशाजनक झाली आहे. सेंसेक्स 1121.15 अंकाच्या घसरणीसह 36,445.47 वर उघडला आहे. तर निफ्टीमध्येही मोठी घसरण पहायला मिळाली आहे. निफ्टीमध्ये 317.50 अंकांची घसरण झाली असून तो 10,665.70 अंकांवर पोहचला आहे. आज सेंसेक्स 100 पेक्षा अधिक अंकांच्या घसरणीसह उघडला आहे. सकाळी 9.16 च्या सुमारास सेंसेक्स 1164.38 अंकांच्या (3.10%) घसरणीसह म्हणजे 36411.24 वर उघडला आहे. निफ्टी 326.60 अंकांच्या (2.97%) अंकांनी घसरत 10662.90 वर उघडला आहे. दरम्यान आज सकाळी 520 शेअर्समध्ये घसरण पहायला मिळाली आहे. एशियन पेंट्स, आईओसीला फायदा झाला आहे. तर एसबीआई, ओएनजीसी, जेएसडब्ल्यू स्टील, वेदांत, हिंडाल्को, इंडसइंड बैंक आणि आरआईएल यांचं नुकसान झालं आहे.
सध्या जगभर दहशत निर्माण करणारा कोरोना वायरस आणि येस बॅंकेच्या आर्थिक संकटाचा शेअर बाजाराला फटका बसला आहे. शुक्रवारीदेखील शेअर बाजारात मोठी घसरण पहायला मिळाली. येस बॅंकेचे शेअर्स 6 रूपयांपर्यंत पोहचल्याचे चित्र होते. त्यानंतर काही काळाने त्याच्यामध्ये सुधारणा पहायला मिळाली. हळूहळू तो 19 पर्यंत पोहचला. Petrol- Diesel Prices: पेट्रोल- डिझेल च्या किंमतीत सलग चौथ्या दिवशी घसरण; मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर मधील दर जाणून घ्या.
पहा आजचा सेनेंक्स आणि निफ्टीचा दर
Sensex at 36,445.47, down by 1131.15 points. pic.twitter.com/eCEm5hDvd3
— ANI (@ANI) March 9, 2020
शुक्रवारी सेंसेक्स 893.99 अंकांनी घसरून 37,576.62 अंकांवर बंद झाला आहे. तर निफ्टी 289.45 अंकांनी खाली जात 11,000 पर्यंत पोहचला. तर निफ्टीमध्येही घसरण झाल्याने ती 10,979.55 अंकांवर बंद झाली. शुक्रवारी देखील बीएसई वर टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पहायला मिळाली. बजाज ऑटो, एशियन पेंट्स आणि मारूतीच्या शेअर्समध्ये तेजी पहायला मिळाली. 10 मार्च दिवशी धुळवड असल्याने शेअर बाजार बंद राहील.