देशभरातील विविध ठिकाणी पेट्रोल (Petrol Rates) आणि डिझेलचे (Diesel Rates) दर सलग चौथ्या दिवशी उतरले आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या माहितीनुसार प्रतिलिटर पेट्रोल 24 पैशांनी तर डिझेल 26 पैशांनी स्वस्त झाले आहे. यानुसार आता मुंबई (Mumbai), दिल्ली (Delhi) येथे अनुक्रमे, पेट्रोल 76.29 रुपये आणि 70.59 रुपये इतक्या किमतीत उपलब्ध आहे. दुसरीकडे डिझेलचे दर मुंबईत प्रति लिटर 66.24 तर दिल्लीत प्रति लिटर 63.26 इतके आहेत. आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील चढत्या उतरत्या किमतींचा देशातील पेट्रोल डिझेच्या दरावर होणाऱ्या परिणामातून या किमती सध्या समोर येत आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात इंधनावरील व्हॅट 1 रुपयाने वाढवण्यात आला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प मांडताना ही घोषणा केली. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर एक रुपयांनी वाढणार आहेत, मात्र सध्याच्या किमतीनुसार हे दर निश्चितच फार नसतील अशी शक्यता आहे. (हे ही वाचा -गाडीत जर पेट्रोलऐवजी डिझेल किंवा डिझेलऐवजी पेट्रोल भरले तर काय करावे? जाणून घ्या या काही खास टिप्स )
ठिकाण पेट्रोल डिझेलचे दर
कोल्हापूर 76.95 65.91
मुंबई 76.29 66.50
नागपूर 76.84 65.81
पुणे 76.37 65.32
दरम्यान, पेट्रोल डिझेलच्या दरात घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे रशिया आणि सौदी अरेबिया हे दोन देश ठरत आहेत, दोन्ही देशांमध्ये तेलाच्या किमतीत सुरु असणारे दर युद्ध पाहता या किमती घसरत असल्याचे दिसत आहे, यामुळेच अमेरिकेत सुद्धा तेलाचे दर 27टक्क्यांनी खाली आले आहेत. चार वर्षातील हे नीचांकी दर आहेत.तूर्तास कच्च्या तेलाचा दर प्रतिपिंप 32डॉलर तर प्रतिपिंप ब्रेन्ट क्रूड ऑइल दर 35 डॉलर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात 1991 नंतर पहिल्यांदाच तेलाच्या दरात इतकी मोठी घसरण झाली आहे.