![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2024/08/anil-ambani-380x214.jpg)
अनिल अंबानी यांच्यावर बंदी घालण्यात आली असून 25 कोटींचा दंडही त्यांना ठोठावण्यात आला आहे. सेबीने अनिल अंबानींच्या विरोधात केलेली ही मोठी कारवाई आहे. रिलायन्स होम फायनान्सच्या माजी अधिकाऱ्यांसह 24 इतर संस्थांवर इक्विटी मार्केटमध्ये पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. फंड डायव्हर्जनच्या आरोपांखाली सेबीने ही मोठी कारवाई केली आहे. एवढंच नाही तर मार्केट रेग्युलेटरने रिलायन्स होम फायनान्सला सिक्युरिटी मार्केटमध्ये सहा महिन्यांची बंदी घातली आहे आणि त्यांनाही सहा लाखांचा दंड ठोठावला आहे. (हेही वाचा - अनिल अंबानी म्हणाले, 'मी दिवाळखोरीत, माझ्याकडे फुटकी कवडीही नाही')
अनिल अंबानी यांनी RHFL च्या प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने, RHFL मधील निधी त्यांच्याशी संबंधित संस्थांना कर्ज म्हणून दाखवून फसव्या योजना आखल्या होत्या असं आढळलं. आपल्याशी संबंधित कंपन्यांना कर्ज दिल्याचं दाखवत त्यांनी हे लपवलं होतं. RHFL च्या संचालक मंडळाने अशा कर्ज पद्धती थांबवण्याचे कठोर निर्देश जारी केले होते आणि कॉर्पोरेट कर्जाचे नियमितपणे पुनरावलोकन केले होते.
अनिल अंबानी यांनी ADA समुहाचे अध्यक्ष’ म्हणून आपल्या पदाचा आणि RHFL च्या होल्डिंग कंपनीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण अप्रत्यक्ष शेअरहोल्डिंगचा वापर फसवणूक करण्यासाठी केलाय उर्वरित संस्थांनी एकतर बेकायदेशीरपणे मिळवलेली कर्जे किंवा RHFL कडून पैसे बेकायदेशीरपणे वळवता येण्यासाठी लाभार्थ्यांची भूमिका बजावली आहे, असं सेबीने नमूद केलं आहे.