YONO (Photo Credits- Twitter)

देशातील सर्वाधिक मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. त्यानुसार बँकेकडून आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजेच योनो अॅपचे (YONO App) नवे वर्जन सुरु करण्याच्या दिशेने काम करत आहे. एसबीआयचे चेअरमॅन दिशेन खारा यांनी ही माहिती ग्राहकांना दिली आहे. इंडस्ट्री बॉडी आयएमसी द्वारे आयोजित एका बँकिंग कार्यक्रमादरम्यान खारा यांनी म्हटले की, बँकेने योनोची सुरुवात केली होती. तेव्हा रिटेल सेगमेंटच्या प्रोडक्ट्सच्या डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्मच्या रुपात घेतले जात होते. पुढे असे म्हटले की, एसबीआय आंतरराष्ट्रीय परिचालनासाठी योनोच्या क्षमतेचा वापर करु शकतात. खासकरुन जेथे आमच्याकडे रिटेल ऑपरेशन्स आहे. आम्ही योनोचा वापर व्यापारासाठी सुद्धा करु शकतो.

आता आम्ही विचार करत आहोत की, या सर्व सुविधा योनोच्या पुढील वर्जनमध्ये एकत्रित कशा पद्धतीने आणू शकतो. यावर काम करत असून लवकरच त्या उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. बँकेची 2020-21 च्या आर्थिक रिपोर्टनुसार, 31 मार्च 2021 पर्यंत योनो अॅप जवळजवळ 7.95 कोटी लोकांनी डाऊनलोड केले आहे. तर 3.71 कोटी लोकांनी रजिस्ट्रेशन केले आहे.(SBI Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस पदांसाठी भर्ती, जाणून घ्या पात्रता, वेतन आणि पदसंख्येबाबत)

तसेच आता येत्या 18 जुलै रोजी बँकेने एक ट्विट करत त्यांच्या कोणत्या सुविधा बंद राहणार आहेत याबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार मॅन्टेनन्स कामासाठी आज रात्री 11.30 वाजल्यापासून ते 1.30 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. यामध्ये इंटरनेट बँकिंग, योनो, योनो लाइट, युपीआय सर्विसचा समावेश असणार आहे.

Tweet:

स्टेट बँक ऑफ इंडियाचे (State Bank Of India) ग्राहक असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण बँकेच्या नव्या सुविधेचा फायदा घेत फसवणूकदारांकडून नागरिकांची लूटमार केली जात आहे. सध्या बँकेच्या ग्राहकांना KYC बद्दल फसवणूक केल्याचे सांगण्यात आले आहे. या माध्यमातून फसवणूकदार ग्राहकांच्या खात्यामधून पैसे काढू शकतात.  त्यामुळे बँके संदर्भातील कोणतेही काम ऑनलाईन पद्धतीने करण्यापूर्वी विचार करा. [Poll ID="null" title="undefined"]