Robbery News: SBI बॅंकेत मनी हाईस्ट स्टाईल दरोड्याचा थरार, चोरीचा थरार ऐकून तुम्हीही व्हाल हैराण
Robbery (Representative Image- File)

बहुचर्चित स्पॅनिश मनी हाईस्ट या वेबसिरीजचा एक सिजन तरी तुम्ही नक्कीचं बघितला असेल. त्यात प्रोफेसर जसा आपल्या शहरांची नाव असलेल्या सवंगड्यांना घेवून द बॅंक ऑफ स्पेनवर डल्ला मारतो. त्याचं स्टाईलने काही दरोडेखोरांनी भारतीय स्टेट बॅंकेवर लाखोंचा दरोडा घातला आहे. विशेष म्हणजे या चोरट्यांनी या बॅंकेतील कॅश म्हणजेचं एकाही रुपयाला हात लावला नसुन तब्बल दोन किलो सोनं चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरी या सोन्याची किंमती एकूण ९४ लाख असल्याचं बॅंक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. दरोडेखोरांचं (Robbery) चोरीचं प्लॅनिंग पाहून पोलिसही हैराण झालं आहे. मनी हाईस्ट या वेबसिरिजमध्ये ज्याप्रमाणे प्रॉफेसर आणि त्याची गॅग सुरंग खोदत बॅंकेवर डल्ला मारतात त्याच प्रमाणे या दरोडेखोरांनी देखील बॅंकेपासून १० फूट अंतर लांबून सुरंग खोदत आणून या चोरीची मोहिम फत्ते केली.

 

ही मनी हाईस्ट स्टाईल चोरी उत्तर प्रदेशातील कानपूरच्या एसबीआय बॅंकेत झाली असुन हा चोरीचा प्रकार उघडकीस आल्यावर पोलिसांनी देखील डोक्यावर हात मारुन घेतला आहे. तरी चोरांनी हा एवढा मोठा डल्ला मारला तरी कुणाला कानोकान खबर लागली नाही आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी बॅंक कर्मचारी बॅकेत आल्यावर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. बॅंकेतील सीसीटीव्हीमध्ये ही चोरीची घटना कैद झाली असुन सोशल मिडीयावर सध्या हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. (हे ही वाचा:- Nashik Robbery: नाशकात दरोडेखोरांची दहशत, दरोड्यात मौल्यवान ऐवज लंपास करत 65 वर्षीय वृध्दाची हत्या)

 

उत्तर प्रदेश सध्या थंडीने गारठला आहे. त्यामुळे हल्ली परिसर लवकर शांत होत असुन संधी साधत या चोरांनी ही सुरंग खोदल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करत कानपूर पोलिस सध्या या दरोड्याची कसुन चौकशी करत आहेत. लवकरचं चोरट्यांना जेरबंद करण्यात येईल त्यामुळे कानपूरातील नागरिकांनी कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये असे कानपूर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.