SBI Recruitment 2020: स्टेट बँक मध्ये यावर्षी 14,000 जागांसाठी भरती निघणार , बँकेने दिली 'ही' महत्त्वाची माहिती
SBI (Photo Credits: Facebook)

संपूर्ण देश कोरोना व्हायरस (Coronavirus) सारख्या महाभयाण संकटामुळे पिळून गेला असून त्यामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनचा (Lockdown) लोकांवर आर्थिकदृष्ट्या चांगलाच फटका बसला आहे. अनेकांच्या नोक-या गेल्या, काम, उद्योगधंदे काही प्रमाणात ठप्प झाले आहेत. या सर्वांमध्ये पिचून गेलेल्या सामान्य नागरिकांसमोर घरं चालवायचे कसे असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान SBI बँकेने एक दिलासादायक बातमी सर्वांसाठी आणली आहे. SBI बँकेत यावर्षी 14,000 पदांसाठी भरती (SBI Recruitment 2020) निघणार आहे. यासाठी बँक खास योजना बनवत असल्याचे सांगण्यात येत आहे.

SBI कडून दिल्या जाणा-या या नोकरीसाठी देशातील वेगवेगळ्या राज्यांतून वेगवेगळ्या पदांसाठी नोकरी निघणार आहे. SBI चे म्हणणे आहे की, "ते आपल्या सेवांचा अधिकाधिक प्रमाणात विस्तार करत आहेत. त्यामुळे यासाठी त्यांना जास्त लोकांची गरज भासेल. SBI ने ही घोषणा अशा वेळी केली आहे जेव्हा त्यांनी 'ऑन टॅप व्हीआरएस' ची योजना बनवत आहे." Railway Recruitment 2020: रेल्वेमध्ये 4,499 पदांची नोकर भरती; 10 वी पास करू शकतात अर्ज, जाणून घ्या पदांची माहिती व महत्वाच्या तारखा

एसबीआय बँकेचा विस्तार वाढत असून यासाठी अधिकाधिक लोकांची गरज भासणार आहे. त्यामुळे यावर्षी एसबीआयमध्ये 14,000 जागांसाठी भरती निघणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ऑन टॅप व्हिआरअस बाबत एसबीआयचे म्हणणे आहे की, त्यांच्याजवळ 2.5 लाख इतके कर्मचारी आहेत जो कर्मचा-यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहेत.

या स्टेट बँकेच्या या व्हिआरएस योजनेमध्ये 25 वर्षे सेवेत असलेल्या वा 55 वय पूर्ण झालेल्या सर्व अधिका-यांसाठी आणि कर्मचा-यांसाठी ही योजना खुली राहील असे सांगण्यात येत आहे.