Sanjay Raut (Photo Credits: PTI)

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यामधील कलगीतुरा मागील काही दिवसांपासून सुरूच आहे. दरम्यान काल ईडीने (ED) संजय राऊतांच्या संपत्तीवर टाच आणल्यानंतर आज पुन्हा त्यांच्याकडून किरीट सोमय्यांवर नवा आरोप करण्यात आला आहे. आयएनएस विक्रांत (INS Vikrant) वाचवण्यासाठी किरीट सोमय्यांनी 57 कोटी रूपये गोळा केले असल्याचं म्हटलं आहे.

सोमय्यांनी गोळा केलेली रक्कम पुढे गेली कुठे? असा प्रश्न विचारताना त्यांनी भाजपाने निवडणुकीत वापरली की किरीट सोमय्यांची कंस्ट्रक्शन कंपनीत वापरली? असा खोचक प्रश्न देखील विचारला आहे. दरम्यान हा देशद्रोहाचा गुन्हा आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली गोळा केलेले पैसे कोणाच्या खिशात गेले याची महाराष्ट्र सरकारच्या तपास यंत्रणांनी चौकशी केली पाहिजे, केंद्रीय तपास यंत्रणा जर पारदर्शक आणि निष्पक्ष असतील तर सीबीआय, इन्कम टॅक्स आणि भाजपाची पदाधिकारी असणारी ईडी यांनी चौकशी करावी. त्यांना काही सापडत नसेल तर मी मदत करेन असं वक्तव्य देखील राऊतांनी आज मीडीयाशी बोलताना केले आहे. अशा कारवाईनंतर ते संजय राऊत असे आरोप करत राहतात - देवेंद्र फडणवीस.

संजय राऊत ट्वीट

दरम्यान संजय राऊतांनी आज ट्वीटवर सोमय्यांचा जुना फोटो ट्वीट केला आहे. यामध्ये 'उलटा चोर कोतवाल को दांटे' म्हणत भाजपाला उत्तर तर द्यावंच लागेल असे म्हटलं आहे.