Shirdi Sai Baba | ((Photo Credit: sai.org)

Sai Baba’s Idols In Hindu Temples: तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) शिवभक्त असलेल्या सुरेशबाबू नावाच्या शैव पुरुषाने साई बाबांच्याविरुद्ध (Sai Baba) मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हिंदू धार्मिक आणि चॅरिटेबल एंडोमेंट्स (HR & CE) विभागाच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या विविध मंदिरांमध्ये स्थापित केलेल्या शिर्डीच्या साईबाबांच्या मूर्तींवर त्यांनी आक्षेप घेतला आहे. साईबाबांच्या पांढऱ्या संगमरवरी मूर्ती मंदिरांमध्ये ठेवणे हे सनातन धर्माच्या विरोधात आहे असा युक्तिवाद त्यांनी केला आहे. त्यामुळे 19व्या शतकातील साई बाबांच्या मूर्ती मंदिरांमधून हटविण्याचे निर्देश एचआर आणि सीई विभागाला द्यावेत अशी त्यांची मागणी आहे.

याआधी 2016 मध्ये, द्वारका पीठ शंकराचार्यांनी आयोजित केलेल्या धर्म संसद किंवा धार्मिक संमेलनात 'सनातन धर्म' (हिंदू धर्म) च्या अनुयायांनी साई बाबांची देवता म्हणून पूजा करू नये असा ठराव स्वीकारला होता.

आता  आपल्या याचिकेत सुरेशबाबू म्हणाले की, साईबाबांच्या धार्मिक ओळखीबद्दल कोणतीही पुष्टी नाही आणि त्यांचे खरे नाव माहित नाही. मुस्लिमांसह अनेक धाम्रांचे लोक त्यांचे अनुयायी आहेत. पर्शियन श्लोक उद्धृत करण्याव्यतिरिक्त साई बाबांनी अनेकदा अल्लाह आणि कुराण बद्दल भाष्य केले होते. दुसरीकडे, त्यांनी काही घटनांमध्ये हिंदू देवतांबद्दल त्यांच्या हिंदू अनुयायांनाही संबोधित केले होते. (हेही वाचा: Ayodhya Ram Temple: पहिल्याच पावसानंतर राम मंदिराच्या छताला गळती, ड्रेनेजची व्यवस्था नाही; मुख्य पुजारी Acharya Satyendra Das यांचा दावा)

सुरेशबाबू यांच्या म्हणण्यानुसार, साई बाबा वारंवार ‘अल्लाह रखेंगा वैया रहेना’ या वाक्याच्या प्रयोग करत असत. याचा अर्थ आपल्याजवळ जे आहे त्यावर समाधान मानाने म्हणजेच अल्लाह जसे आपल्याला ठेवत आहे तसे राहणे हा होय. या याचिकेवर सुनावणी करताना प्रभारी मुख्य न्यायमूर्ती आर. महादेवन आणि न्यायमूर्ती मोहम्मद शफीक यांच्या खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारच्या वकिलांना या याचिकेवर दोन आठवड्यांच्या आत एचआर आणि सीई विभागाकडून सूचना घेण्याचे निर्देश दिले.