Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे भारताची चिंता वाढली, सामान्यांवर मोठे परिणाम होण्यामागील कारणे जाणून घ्या
युक्रेन-रशिया युुद्धाचे भारतावर परिणाम (Photo Credits-File Image)

Russia-Ukraine War: अखेर आज रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध सुरु झाले आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर रशियन सैन्याने युक्रेनमधील अनेक शहरांवर हल्ला केला. ऐवढेच नव्हे तर स्थानिक परिसरात हल्ल्यांचे मोठे आवाज सुद्धा आवाज ऐकू आले. आतापर्यंत सेनेच्या जवानांसह शेकडो लोक ठार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांसह संपत्तीचे सुद्धा फार मोठे नुकसान होत असल्याचे वृत्त समोर येत आहे. याच दरम्यान भारताने स्पष्ट केले आहे की, त्यांची भुमिका तटस्थ असून यावर शांतपणे तोडगा निघाला पाहिजे.

युक्रेनवर रशियाकडून करण्यात आलेल्या हल्ल्याचा  अर्थव्यवस्थेवर ही मोठा परिणाम झाला आहे अनिश्चित कालावधीसाठी भारतासह काही देशातील स्टॉक मार्केटमध्ये सकाळी घसरण दिसून आली. तसेच तेल आणि गॅस किंमतीत वाढ होणार असल्याची जवळजवळ अपेक्षा केली जात आहे. एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे ती. युक्रेन आणि रशियाच्या या वादाचे पडसाद भारतावर उमटून महागाई वाढू शकते.(Russia-Ukraine Conflict: युद्ध परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील युक्रेन मध्ये अडकेल्या व्यापारी, विद्यार्थी, प्रवाशांनी प्राधान्याने केंद्र सरकार सोबत संपर्क साधावा- CM Uddhav Thackeray यांच्या सूचना)

या दोन्ही देशांमधील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीवर परिणाम होण्यास दिसून आले आहे. गुरुवारी ब्रेंट क्रुड ऑइल (Brent Crude Oil) ची किंमत 103 डॉलर प्रति बॅरल झाली. गेल्या काही आठवड्यांपासून कच्च्या तेलाच्या किंमती 90 डॉलर प्रति बॅरलच्या जवळ होत्या. पेट्रोलियमच्या किंमतीसाठी दोन्ही बेंचमार्क सोमवार (14 फेब्रुवारी) ला सप्टेंबर 2014 नंतर आपल्या सर्वाधिक स्तरावर गेला होता. ज्यामध्ये ब्रेंट 98.78 डॉलर प्रति बॅरल आणि डब्लूटीआय 95.82 डॉलर प्रति बॅरल झाला होता.

दरम्यान त्यामध्ये नंतर सुधारणा सुद्धा झाली. रशियाचा जागतिक कच्च्या तेलाच्या उत्पादनात जवळजवळ 13 टक्के हिस्सा आहे. जो ओपेकच्या एकूण उत्पादनाच्या अर्धा आहे. आता सैन्यातील संघर्ष वाढल्याने कच्च्या तेलाच्या निर्यातीवर ही परिणाम होणार आहे. यामुळे किंमतीत वाढ होईल. असा अंदाज लावला जात आहे की, कच्च्या तेलाच्या किंमतीत 1 डॉलर प्रति बॅरल वाढ झाल्यास भारताच्या अर्थव्यवस्थेवर हजारो करोडोंचे बोझा वाढू शकतो.

नैसर्गिक गॅसच्या किंमतीवर सुद्धा युद्धाचे परिणाम दिसून येतील. तेलाप्रमाणेच यामध्ये वाढ होऊ शकते. कारण नैसर्गिक गॅसच्या जागतिक पुरवठ्याचा जवळजवळ 40 टक्के भाग रशियाकडे आहे.

भारताकडून आपल्या गरेजेनुसार 85 टक्के तेल आयात करते. ज्यामध्ये बहुदा आयात ही सौदी अरेबिया आणि अमेरिकेतून केली जाते. या व्यतिरिक्त भारत, इराक, ईराण, ओमान, कुवैत, रशिया या देशांकडून सुद्धा तेलाची खरेदी केली जाते. नैसर्गिक गॅससाठी भारत काही मर्यादेपर्यंत रशियावर निर्भर आहे. अशातच तेल आणि नैसर्गिक गॅसचा पुरवठा प्रभावित झाल्याने देशात दैनंदिनच्या गोष्टी महागण्याची शक्यता आहे.

>>व्यापारावर प्रभाव

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकतेच असे म्हटले की, रशिया आणि युक्रेनमधील तणावाचा परिणाम अद्याप भारताच्या व्यापारावर पडलेला नाही. परंतु या जागतिक तणावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आव्हानात्मक आहे. दरम्यान, त्यांनी असे म्हटले की भारत अशी काही पाउले उचलणार ज्याचा रशिया-युक्रेनमधील युद्धाचा परिणाम व्यापारावर होणार नाही.

अमेरिका, ब्रिटेन, जापान, कॅनडासह काही देशांनी रशियावर आर्थिक बंदी घातली आहे. आता युद्ध सुरु झाल्यानंतर रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर ही बंदी घातली जाऊ शकते. 2021 च्या अखेरीस जेव्हा पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती तेव्हा भारत व रशियाने आपल्यातील नाते अधिक घनिष्ठ करण्यासंदर्भात योजनांवर चर्चा केली होती. पण आता युक्रेनच्या बचावात रशियासमोर अमेरिकेसह काही देश आल्याने याचा फटका भारताला पडत आहे. कारण दोन्ही देशांतील व्यापरातील नातेसंबंध हे या युद्धामुळे अडथळा आणू शकते.

गेल्या आर्थिक वर्षात रशियाची भारतात एकूण आयात ही 1.4 टक्के होती. दोन्ही देशांनी 2025 पर्यंत द्विपक्षीय गुंतवणूकीला 3.75 लाख कोटी रुपये आणि द्विपक्षीय व्यापारासाठी 2.25 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, युक्रेनच्या पृष्ठभूमीवर भारताचे उत्तम व्यापार संबंध आहेत. देशातील हजारो विद्यार्थी हे युक्रेनमध्ये शिकण्यासाठी जातात.