RRB-NTPC-Protest (Photo Credits-Twitter)

RRB-NTPC Protest:  बिहार बंदचे विद्यार्थ्यांकडून घोषणा करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध शिक्षक आणि युट्यूबर खान सर यांनी एक व्हिडिओ जाहीर करत शुक्रवारी विद्यार्थ्यांसाठी एक अपील केले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले की, कोणत्याही प्रकारचे आंदोलन (RRB-NTPC Protest) किंवा आंदोलन न करण्याचे आवाहन केले आहे. आंदोलनादरम्यान, तोडफोड आणि आग लावण्याच्या घटनेप्रकरणी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यामागील आरोपी खान सर यांच्यासह 6 शिक्षकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. पटना येथील पत्रकार नगर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करत खान सर यांच्या विरोधात गंभीर आरोप ही लावण्यात आले आहेत.

एफआयआर दाखल केल्यानंतर खान सर यांनी आपल्या पटना येथील कोचिंग बंद करुन पळ काढला आहे. बुधवारी म्हणजेच 26 जानेवारीला बिहार मधील काही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी स्टेशनमध्ये रेल्वेला आग लावल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर खान सर यांच्या विरोधात 6 कोचिंग संस्थेचे संचालक शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आता खान सर हे फरार आहेत.त्यांनी आपला फोन सुद्धा बंद केला असून कोचिंग संस्था Khan GS Research Center बंद झाले आहे.(Bihar: रेल्वे भर्तीसंदर्भात उमेदवारांकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनादरम्यान गया येथे पेटवली ट्रेन Watch Video)

खान सर यांनी त्यांच्या युट्यूबरवर विद्यार्थ्यांना अपील करणारा एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना वारंवार शुक्रवारी कोणीही आंदोलन करु नये असे आवाहन केले आहे. खान सर यांनी पुढे असे म्हटले की, रेल्वेला इंटेलिजेंसकडून रिपोर्ट मिळाला आहे की, गोरखपुर मधील काही विद्यार्थी गोंधळ निर्माण करु शकतात. खान सर यांनी असे ही म्हटले की, गोरखपुर मधील विद्यार्थी हे आपल्या लोकांप्रमाणेच आहेत. त्यामुळे सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अपील करण्यात येत आहे की, रस्त्यावर उतरुन कोणत्याही प्रकारचे आंदोलन करु नये.