Narendra Modi condoles the death of Rishi Kapoor (Photo Credits: PTI & Instagram)

बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते ऋषि कपूर यांचे आज सकाळी मुंबईतील Reliance Foundation Hospital मध्ये निधन झाले. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. ऋषि कपूर यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर कुटुंबियांसह चाहते देखील हळहळले. बॉलिवूड कलाकार, राजकीय नेते यांनी ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत या दिग्गज अभिनेत्याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. Powerhouse of Talent म्हणत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसंच ऋषि कपूर यांच्या कुटुंबियाचे आणि चाहत्यांचे सात्वंतही त्यांनी केले आहे. (ऋषि कपूर यांच्या निधनावर शरद पवार, राहुल गांधी, प्रकाश जावडेकर यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी व्यक्त केला शोक; ट्विटच्या माध्यातून वाहिली श्रद्धांजली)

प्रेमळ, चैतन्यशील आणि बहुगुणी... असे ऋषि कपूर जी. ते टॅलेंटचे पावरहाऊस होते. मला नेहमीच आमच्या संभाषणाची आठवण येत राहील.. अगदी सोशल मीडियावरील पण. त्यांना सिनेमा आणि भारताच्या प्रगतीचा ध्यास होता. त्यांच्या निधनाने झालेले दुःख अपार आहे. त्यांच्या कुटुंबिय आणि चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे, अशा आशयाचं ट्विट मोदींनी केलं  आहे.

PM Narendra Modi Tweet:

29 एप्रिल रोजी बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता इरफान खान याचे मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये निधन झाले. इरफान खान याचे निधन हे सिनेजगतासाठी मोठे नुकसान आहे, अशा शब्दांत मोदी व्यक्त झाले होते. त्यानंतर आज ऋषि कपूर यांचे निधन वेदनादायी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.