RBI on Paytm Payments Bank: पेटीएमची 'ती' विनंती मान्य करुन परिक्षण करण्यास आरबीआयची सूचना
Paytm | (Photo credit: archived, edited, representative image)

भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला (National Payments Corporation of India) पेटीएम (Paytm) औपचारिकपणे वन 97 कम्युनिकेशन्स (One 97 Communications) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, थर्ड पार्टी ॲप्लिकेशन प्रदाता (TPAP) बनण्यासाठी केलेल्या विनंतीचे परीक्षण करण्यास सांगितले आहे. पेटीएमची सेवा पुढे सुरु ठेवावी की नाही याबाबत NCPIला युपीआयच्या परवानगीबाबत विचार करण्यास सांगितलं आहे. (हेही वाचा- Paytm FASTag: पेटीएम फास्टॅग निष्क्रिय करायची आणि नवीन घेण्याची पद्धत, जाणून घ्या)

आरबीआयनं 15 मार्च 2024 नंतर पेटीएम पेमेंट बँकेतून ग्राहकांच्या खात्यात आणि वॉलेटमध्ये पैसे स्विकारण्यास निर्बंध घातले आहेत. रिझर्व्ह बँकेनं याप्रकरणी पेटीएमची मालक कंपनी असलेल्या 'वन 97 कम्युनिकेशन लिमिटेड'पुढे हा प्रस्ताव ठेवला होता. आरबीआयनं NPCIला पेटीएमला चार ते पाच बँकांकडून पैशांचे व्यवहार करण्याची सुविधा देण्यास सांगितलं आहे.

रिझर्व्ह बँकेने मुदत वाढवून दिलेल्या सवलतीनुसार, 15 मार्चनंतर पेटीएम पेमेंट्स बँकेच्या वॉलेटमध्ये, बचत किंवा चालू खात्यात पैसे जमा होणार नाहीत. याचा अर्थ असा की जर तुमचा पगार पेटीएम पेमेंट्स बँकेच्या खात्यात आला, तर तुम्हाला 15 मार्चनंतर अडचणी येऊ शकतात. कारण तुमचा पगार पेटीएम पेमेंट्स बँकेच्या खात्यात जमा होणार नाही.