Remdesivir (Photo Credits: ANI)

Zydus Cadila या कंपनीकडून आज(13 ऑगस्ट) देशातील सर्वात स्वस्त दरामधील अ‍ॅन्टी व्हायरल ड्रग रेमडीसिवर (Remdesivir)चे जेनेरिक औषध उपलब्ध करण्यात आले आहे. दरम्यान सध्या देशात कोविड 19च्या रूग्णांनावर उपचारासाठी Remdesivir ची कमतरता भासत असल्याचे जाणवत आहे. अशामध्ये आता काळा बाजार रोखण्यासाठी आणि गोर गरिबांपर्यंत हे औषध पोहचण्यासाठी मदत होणार आहे. भारत हा जगातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांच्या यादीमधील तिसर्‍या स्थानावरील देश आहे. Zydus Cadila च्या COVID 19 विरूद्ध संभाव्य लसीचे पहिल्या टप्प्यातील निष्कर्ष समाधानकारक; 6 ऑगस्ट पासून दुसर्‍या टप्प्याला सुरूवात

Zydus Cadila कडून रेमिडिसीवर औषधाच्या बाटलीची किंमत प्रत्येकी 2800 रूपये इतकी ठरवण्यात आली आहे. प्र्ति बॉटल ही 100mg औषधाची असेल. Remdac या ब्रॅन्डच्या नावाखाली सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलम,अध्ये कोविड 19च्या रूग्णांसाठी हे औषध विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

भारतामध्ये अनेक शहरांत कोविड 19 च्या वाढत्या रूग्णसंख्येच्या तुलनेत औषधं कमी असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र या आठवड्याच्या सुरूवातीलाचा सिपला या अग्रगण्य औषध कंपनीकडून रेमडीसिवीरच्या पुरवठ्याला स्थिर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात आले आहे.

Zydus ही पाचवी औषध कंपनी आहे ज्यांनी रेमडीसिव्हरची निर्मिती सुरू केली आहे. यापूर्वी Hetero Labs Ltd, Cipla, Mylan NV आणि Jubilant Life Sciences Ltd कडून रेमडीसिव्हर उपलब्ध करून दिले जात आहे. दरम्यान Dr.Reddy’s Laboratories Ltd आणि Syngene International Ltd सोबत करार करून भारतासह 127 देशांना औषध पुरवण्यासाठीदेखील करार केले जात आहे.

भारतामध्ये आज सर्वाधिक 66,999 नव्या कोरोना रूग्णांची देशात भर पडली आहे. सध्या देशातील कोरोना बाधितांचा आकडा 23,96,638 च्या पार गेला आहे.