आरबीआय लागू करणार दहा रुपयांची नवी नोट, मोबाईल ऍप सुरु करण्यासाठी देखील प्रयत्न सुरु
Reserve Bank of India (Photo Credits: PTI)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) सोमवारी केलेल्या घोषणेनुसार लवकरच दहा रुपयांची नवी न चलनात लागू करण्यात येणार आहे. गव्हर्नर शक्तिकांता दास (Governor Shaktikanata Das)  यांच्या स्वाक्षरीने ही नोट अधिकृतरित्या सुरु करण्यात येणार आहे. काहीच दिवसात महात्मा गांधी (Mahatma Gandhi Series) यांच्या नव्या शृंखलेत ही नोट समाविष्ट करण्यात येईल.केंद्रीय बँकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत अधिकृत माहिती देत महात्मा गांधींची प्रतिमा असणाऱ्या नव्या शृंखलेतील नोटांचे व साह्य चलनात असणाऱ्या नोटांचे मूल्य समानच असणारा आहे यात केवळ रंग व डिजाईन च्या बाबतीत काही बदल करण्यात येतील असे सांगितले आहे.

अलीकडे वेगवेगळ्या योजना आणून भारतीय रिजर्व्ह बँकेकडून दृष्टीहीन लोकांसाठी सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात होता याच प्रयत्ननातून 'इंटाग्लियो प्रिंटिंग' पद्धत वापरून स्पर्शातून नोटांचे मूल्य कळेल अशी तरतूद करण्यात आली होती. तूर्तास ही पद्धत केवळ अधिक राशींच्या नोटांसाठी वापरण्यात येत असली तरी काहीच दिवसात सर्वच नोटांची छपाई या पद्धतीने सुरु करण्यात येण्याची शक्यता आहे.

काय असतील मोबाईल ऍपच्या सुविधा

नवीन नोटांसोबतच लवकरच बँकेकडून नवीन मोबाईल ऍप देखील बनवण्याची तयारी दर्शवली जातेय. हे मोबाईल ऍप इंटरनेट कनेक्शनच्या शिवाय देखील काम करू शकेल अशा पद्धतीने तयार करण्यात येणार आहे. तसेच यामध्ये नोटांची ओळख सांगणाऱ्या प्रणालीत वेगवेगळ्या भाषेचे पर्याय असणार आहेत. सध्या यासाठी कंपन्यांकडून निविदा मागवण्यात आल्या असून काहीच दिवसात ऍप देखील नागरिकांच्या सेवेत रुजू होईल अशी माहिती मिळत आहे.

यापूर्वी एप्रिलमध्ये आरबीआयकडून 20 रुपयांची नवी हिरवट पिवळ्या रंगाची व 200 रुपयांची नोट चलनात आणण्यात आली होती.