भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नागरिकांसाठी आता येत्या डिसेंबर महिन्यापासून NEFT सुविधेसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार डिसेंबर पासून NEFT या सुविधेचा वापर ग्राहकांसाठी 24 सुरु राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही वेळी दुसऱ्या व्यक्तीला ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवता येणार आहेत. यापूर्वी एनईफटीसाठी वेळेची मर्यादा घालण्यात आली होती. परंतु आता डिसेंबर पासून या सुविधेचा लाभ नागरिकांना कोणत्याही वेळी घेता येणार आहे.
महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी NEFT च्या माध्यमातून नागरिकांना सकाळी 8 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पैसे दुसऱ्याला पाठवता येत होते. मात्र आता या वेळेवरील बंधन आरबीआयने काढून टाकले असून येत्या डिसेंबरपासून ही सुविधा कोणत्याही दिवशी आणि वेळी नागरिकांसाठी सुरु राहणार आहे. NEFT च्या माध्यमातून एका बँकेतून कोणत्याही ठिकाणी असलेल्या बँकेत पैसे अगदी सहजपणे पाठवता येतात.(1 जुलैपासून NEFT आणि RTGS च्या माध्यमातून होणार्या व्यवहारांवर System Charges नाही; आरबीआय चे बॅंकांना आदेश)
तसेच 1 जूनपासून ऑनलाईन माध्यमातून पैसे ट्रान्सफर करणार्यांना वेळेमध्ये वाढ केल्यानंतर त्याचे सेवा शुल्कदेखील माफ केले आहेत. यामुळे बॅंकांना NEFT आणि RTGS च्या माध्यमातून होणार्या देवाणघेवाणीवर शुल्क न आकारण्याचे आदेश दिले होते. तर डिजिटल माध्यमातून व्यवहार वाढवण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने हे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात आले होते.