शाळेतून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, एका आरोपीला अटक
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Latestly/Illustration)

उत्तर प्रदेशात शाळेतून घरी जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोठावल्या आहेत.

रिपोर्ट्नुसार, थाना गढ येथे राहणारी 11 वर्षीय अल्पवयीन मुलगी इयत्ता 6 वी मध्ये शिकते. बुधवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी निघाली होती. यावेळी रस्त्यात तिला बाईकवरुन येणारा नातेवाईक भेटला आणि मुलीला जबरदस्तीने बाईकवर उचलून घेऊन गावाजवळच्या उसाच्या शेतात घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी नातेवाईकासोबत त्याचा मित्र उसाच्या शेताबाहेर कोण येत आहे का यासाठी पाहारा देत होता.

या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीला नातेवाईकाने कोणाला या बद्दल कोणलाही सांगितल्यास जीवे मारुन टाकीन असे धमाकवले. मात्र आजूबाजूच्या लोकांनी हे कृत्य पाहिल्यावर पीडित मुलीच्या घरातील मंडळींना घडलेला प्रसंग सांगितला. त्यावेळी घरातील मंडळींनी पोलिसात धाव घेत आरोपी नातेवाईक आणि त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.