राजधानी रांचीच्या मध्यभागी असलेल्या बिरसा मुंडा बस स्टँडला (Birsa Munda Bus Terminal, Khadgarha) पुन्हा एकदा आग लागली आहे. आगीच्या घटनेत तीन बसेसनी जागीच पेट घेतला. ज्याची दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. वृत्तसंस्था एएनआयनेही आपल्या ट्विटर हँडलवरुन या घटनेचा व्हिडिओ शेअरकेला आहे. बसस्थानकात उभ्या असलेल्या बसेसना अचानक आग लागली आहे. बसला नेमक्या कोणत्या कारणामुळे आग लागली हे मात्र समजू शकले नाही. कारणाचा शोध सुरु असल्याचे समजते.
बसला आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला तत्काळ देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी मोठ्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत सर्व बसेस पूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या. स्थानिक लोकांना अचानक आकाशात धुराचे लोट दिसू लागले. त्यानंतर तीन बसेसला आग लागल्याचे लगेच लक्षात आले. स्थानिकांनी आग विजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात न आल्याने अग्निशमन दलाला कळविण्यात आले. अग्निशमन दलाने वेळीच तेथे पोहोचल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. (हेही वाचा, Ratnagiri Accident: दापोलीत ट्रक- वडाप गाडीचा भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू, 5 गंभीर जखमी)
ट्विट
#WATCH | Jharkhand: Fire breaks out in three buses at Ranchi's Khadgarha bus stop. pic.twitter.com/uRneHDZbnQ
— ANI (@ANI) June 29, 2023
काही महिन्यांपूर्वी याच बसस्थानकात बसला आग लागल्याची घटना घडली होती. त्या वेळी घडलेली घटना ऐन दिवाळीच्या दिवशी घडली होती. ज्यात बस चालक आणि वाहकाचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यावेळी बस चालक आणि वाहक हे मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पुढे आले होते.