Accident (PC - File Photo)

रत्नागिरी दापोलीतील आसूद जोशी आळी इथे ट्रक आणि वडाप गाडीमध्ये भयंकर अपघात झाला असून या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्देवी घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा तर एक गरोदर मातेचाही समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस व्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था घटनास्थळी दाखल झाल्या आणि जखमींना उपचारासाठी नेले. रात्री उशिरा उपचारादरम्यान तीन जणांचा मृत्यू झाला. (हेही वाचा -  Odisha Bus Accident: ओडिशात बसचा भीषण अपघात, दहा जणांचा मृत्यू, आठ गंभीर जखमी)

खाजगी प्रवासी वाहतूक करणारी टाटाची मॅजिक गाडी दापोलीकडून हारणेकडे जात होती. दरम्यान, समोरून येणाऱ्या ट्रक आणि टाटा मॅजिक गाडीची जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भयंकर होता की जागीच पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये कदम कुटुंबियातील दोन तर काजी कुटुंबीयातील दोन दोन व्यक्तीचा समावेश असल्याने कदम, काजी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मरियम गौफिक काझी (6 वर्षे) स्वरा संदेश कदम (8 वर्षे) संदेश कदम, (55 वर्ष) अनिल सारंग (45 वर्षं) फराह तौफिक काझी (27 वर्ष) मिरा महेश बोरकर (22,वर्ष) वंदना चोगले (38) आणि समिया इरफान शिरगावकर अशी या अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत.