आयोध्या (Ayodhya) येथे उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरांचे भूमीपूजन 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते होणार असल्याची माहिती रिपोर्ट्सद्वारे समोर आली आहे. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची (Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust) शनिवारी (18 जुलै) या संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना यासंदर्भातील पत्र पाठवण्यात आले आहे. मात्र भूमिपूजन नेमकं कोणत्या दिवशी करायचं याचा अंतिम निर्णय पंतप्रधान कार्यालयाकडून घेण्यात येणार आहे.
भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केल्याचे रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या गोविंद महाराज यांनी सांगितले आहे. "आम्ही लोकांना 29 जुलै आणि 5 ऑगस्ट या दोन तारखा सुचवल्या आहेत. भूमीपूजनाचा कार्यक्रम हा नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालीच होईल. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भूमीपूजन झालेले असेल," असे गोविंद महाराज यांनी सांगितले. (अयोध्या श्रीराम जन्मभूमी मंदिर ट्रस्ट तर्फे आजपासून रामल्लाच्या ऑनलाईन दर्शनाला सुरुवात; फेसबुक, ट्विटर द्वारे घेता येणार लाईव्ह आरतीत सहभाग)
AIR News Pune Tweet:
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनं अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामासाठी वेळापत्रक निश्चित केलं. यावर्षी 3 किंवा 5 ऑगस्ट रोजी भूमीपूजन करण्यात येईल. यावेळी #पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात येणार असं ट्रस्टतर्फे काल सांगण्यात आलं. pic.twitter.com/ICA9a2S6IS
— AIR News Pune (@airnews_pune) July 19, 2020
यापूर्वी श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी 3 ऑगस्ट आणि 5 ऑगस्ट या दोन तारखा सूचवल्या होत्या. शनिवारी पार पडलेल्या बैठकीनंतर ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी चंपत राय यांनी सांगितले की, "तीन ते साडेतीन वर्षात हे काम पूर्ण होईल. त्याचप्रमाणे नवीन बांधण्यात येणाऱ्या राममंदिराची उंची ही 161 फूट असून त्यात 5 घुमट असतील." दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये केंद्र सरकारला अयोद्धा मधील राम मंदिरासाठी जागा दिली होती आणि या मंदिराच्या बांधकामासाठी ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती.