Ram Jethmalani Dies: पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी यांच्या सह दिग्गजांकडून  राम जेठमलानी यांना श्रद्धांजली; अमित शहा यांनी घेतले राहत्या घरी अंतिम दर्शन
Amit Shah pays homage to Ram Jethmalani | (Photo Credits: Twitter/@AmitShah)

वकिल आणि माजी केंद्रीय मंत्री राम जेठमलानी (Ram Jethmalani) यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. वयाच्या 95 व्या वर्षी आज ( 8 सप्टेंबर ) दिवशी सकाळी राम जेठमलानी यांच्या निधनाचे वृत्त समजताच दिल्ली मधील त्यांच्या राहत्या घरी अनेक दिग्गजांनी भेट देत आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे. यामध्ये अरविंद केजरीवाल, अमित शहा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुब्रम्हणम स्वामी, सोनिया गांधी यांचा समावेश आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राम जेठमलानींना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर अमित शहा यांनी जेठमलानींच्या राहत्या घरी भेट देऊन त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले आहे. ज्येष्ठ वकील आणि माजी केंद्रीय मंत्री राम जेठमलानी यांचे निधन

वयोमानानुसार राम जेठमलानी यांची प्रकृती ढासळत होती. मागील 2 आठवड्यांपासून आजारपणामुळे त्यांची प्रकृती साथ देत नसल्याने अजूनच चिंताजनक बनली होती. दरम्यान राहत्या घरी उपचारादरम्यान आज त्यांनी वयाच्या 95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. राम जेठमलानी हे बहुचर्चित व्यक्तिमत्त्वापैकी एक असल्याने त्यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी आपला शोक व्यक्त केला आहे.

अमित शहा यांची श्रद्धांजली

नरेंद्र मोदी यांचे ट्वीट

अरविंद केजरीवाल यांची श्रद्धांजली

सुब्रम्हणम स्वामी यांचे ट्वीट

सोनिया गांधी यांची श्रद्धांजली

जेठमलानी यांनी 7 दशकं वकीली केली. त्यानंतर त्यांनी 2017 साली त्यांनी वकिलीच्या व्यवसायातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली. मात्र भ्रष्ट नेत्यांविरोधात लढाई कायम ठेवणार अशी घोषणा केली होती.