Rajya Sabha Election 2022: राज्यसभेच्या 13 जागांसाठी 31 मार्च रोजी मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा
Rajya Sabha (Photo Credits: ANI)

राज्यसभेच्या (Rajya Sabha Election 2022) 13 जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) निवडणुकीची घोषणा केली आहे. या 13 जागांसाठी येत्या 31 मार्च रोजी निवडणूक पार पडणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या 13 जागा प्रामुख्याने 6 राज्यांतून भरल्या जाणार आहेत. यात पंजाब येथून पाच, केरळ येतून तीन, असम दोन, हिमाचल प्रदेश, त्रिपूरा आणि नागालँड प्रत्येकी एका जागेचा समवेश आहे. या जागांवर कोण बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधकांनी या जागेवर उमेदवार दिले आणि ते निवडून आणले तर विरोधकांचे राज्यसभेतील बळ वाढणार आहे. मात्र, सत्ताधारी भाजपने या जागा जिंकल्या तर एनडीए सरकारची ताकद राज्यसभेत आणखी वाढली जाणार आहे.

राज्यसभेतून निवृत्त होणारे सदस्य

दरम्यान, असम दोन, हिमाचल प्रदेश, त्रिपूरा आणि नागालँड येथून राज्यसभेचा प्रत्येकी एक सदस्य निवृत्त होत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून राज्यसभेसाठी आता विद्यमान सदस्यांनाच उमेदवारी दिली जाते की, नव्या चेहऱ्यांची निवड केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.