राजस्थान राज्यातील एका महिलेने ग्लाल्हेर मध्यवर्थी कारागृहात ( Gwalior Central Jail) पाठिमागील सात वर्षांपासून बंद असलेल्या पतीच्या पॅरोलसाठी (Parole) केलेल्या अर्जात अजब मागणी केली आहे. या मागणीमध्ये महिलेने म्हटले आहे की, आपल्याला अपत्यप्राप्ती हवी आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाने आपल्या पतीसाठी केलेला पॅरोल अर्ज मंजूर करावा. अर्जदार महिला शिवपुरी(Shivpuri) येथील रहिवासी आहे. दारा सिंह जाटव असे तिच्या पतिचे नाव आहे. लग्नानंतर अवघ्या काहीच काळात तिच्या पतीला एका हत्या प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा झाली. तेव्हापासून तो तुरुगात आहे.
दरम्यान, अर्जदार महिलेचा सासरा आणि कैद्याचे वडील असलेल्या करीम सिंग जाटव यांनी म्हटले आहे की, जेव्हा पोलिसांनी त्याच्या मुलाला अटक केली तेव्हा त्याचे कुटुंब लग्नाचा उत्सवही साजरा करू शकले नाहीत. आता त्यांना आणि त्यांच्या पत्नीला एक नातू हवा आहे. आपला वंश पुढे वाढणयासाठी आणि नातूचे तोंड पाहण्यासाठी कारागृह प्रशासनाने कैद्याला काही दिवसांसाठी का होईना पॅरोलवरती सोडावे.
इंडिया डुडेने दिलेल्या दिलेल्या वृत्तानुसार, कारागृह प्रशासनाने शिवपूर एसपीकडे महिलेचा अर्ज विचारार्थ पाठवला आहे. या प्रकरणावर भाष्य करताना, ग्वाल्हेर सेंट्रल जेलचे अधीक्षक, विदित सिरवैय्या यांनी सांगितले की, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कोणताही कैदी कैदी आणि तुरुंग अधिकाऱ्यांसोबतचे वर्तन 'चांगले' असल्यास त्याला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर पॅरोल मिळण्यास पात्र आहे. मात्र, सिरवैय्या म्हणाले की पॅरोल मंजूर करण्याचा किंवा न देण्याचा अंतिम निर्णय जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे.