Representational Image

Flour Mill Accident: पिठाची गिरणी ही अनेकांच्या उदर्निर्वाहाचे साधन. या साधनामुळे राजस्थानमधील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. पिठाच्या गिरणीत उतरेल्या विद्यूत प्रवाहाचा धक्का बसल्याने या चौघांचा मृत्यू झाल्याचे समजते. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. ही घटना राजस्थानच्या (Rajasthan Tragedy) बाडमेर (Barmer) जिल्ह्यात शुक्रवारी (1 सप्टेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित कुटंबाचा कुटुंबप्रमुख असलेला अर्जुन सिंह हे कामानिमित्त दिल्लीला होते. पाठिमागे असलेल्या त्यांची पत्नी गिरणी चालवून उदरनिर्वाह करत असे.

पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, विद्युत प्रवाह पिठाच्या गिरणीत उतरला. त्यामुळे प्रथम अर्जुन सिंह यांच्या पत्नीला विद्यूत धक्का बसला आणि त्या गिरणीला चिकटल्या. त्यांना वाचविण्यासाठी त्यांची दोन्ही लहान मुले धावली. मात्र, ती दोन मुलांनाही विद्युत धक्का बसला आणि तेही चिकटले. दरम्यान, ही घटना कुटुंबातील ज्येष्ठ असलेल्या सासऱ्यांनी पाहिली. तेही या तिघांना वाचविण्यासाठी धावले. पण, त्यांनाही विद्यूत धक्का बसला आणि तेही चिकटले. त्यामुळे या चौघांचाही करुण मृत्यू झाला.

पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिसांनी घटनाचा तपास सुरु केला आहे. तपासात आणखी तपशील पुढे येईल, असले पोलिसांनी म्हटले आहे. मृत्यूची पुष्टी करताना बारमेरचे एसपी दिगंत आनंद म्हणाले की, तपास सुरू आहे. पुढील तपशीलाची प्रतीक्षा आहे. पोलिसांनी पुढे सांगितले की, आरंग ग्रामपंचायतीतील रामदेवपुरा गावातील रहिवासी अर्जुन सिंह हा पत्नी आणि दोन मुलांना घरी सोडून काही कामानिमित्त दिल्लीला होता. दरम्यान, पाठिमागे ही घटना घडली.