Shocking Video: माकडाने पळवलेली चप्पल शोधताना तरुणाला रेल्वेच्या छतावर विजेचा धक्का, आगीने होरपळून मृतदेह फलाटावर; व्हिडिओ व्हायरल

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातून एक धक्कादायक वृत्त पुढे येत आहे. कासगंज रेल्वे स्टेशनवर ( Kasganj Junction Railway Station) उभ्या असलेल्या ट्रेनवर चढून एक युवक जीवंत जळाला आहे. ट्रेनवरील विद्युत तारेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला. तरुणाचे शरीर बराच वेळ जळत होते.

Shocking Video: माकडाने पळवलेली चप्पल शोधताना तरुणाला रेल्वेच्या छतावर विजेचा धक्का, आगीने होरपळून मृतदेह फलाटावर; व्हिडिओ व्हायरल
Shocking Video | (Photo Credits: Twitter)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातून एक धक्कादायक वृत्त पुढे येत आहे. कासगंज रेल्वे स्टेशनवर ( Kasganj Junction Railway Station) उभ्या असलेल्या ट्रेनवर चढून एक युवक जीवंत जळाला आहे. ट्रेनवरील विद्युत तारेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला. तरुणाचे शरीर बराच वेळ जळत होते. दरम्यान, OHE ने विद्यूतप्रवाह बंद केल्यानंतर तो खाली पडला. या धक्कादायक घटनेचा व्हिडोओही (Shocking Video) व्हायरल (Viral Video) झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, एका महिला प्रवाशाची चप्पल माकडाने पळवली. ती चप्पल घेऊन ते माकड ट्रेनच्या छतावर चढले. तीच चप्पल काढण्यासाठी तरुण माकडाच्या मागे धावला. तो माकडाप्रमाणेच ट्रेनच्या छतावर चढला. दरम्यान, माकडाकडची चप्पल मिळविण्याच्या नादात त्याचा स्पर्श विद्यूत तारेला झाला. ज्यामुळे त्याला विजेचा धक्का बसला. OHE विभागने पाठीमागून विद्यूत पुरवठा बंद करेपर्यंत तरुण 15 मिनीटे जळत होता. आग विझल्यावर तरुणाचा मृतदेह रेल्वेच्या छतावरुन खाली उतरवला. (हेही वाचा, Viral Video: विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला टीसीची बेदम मारहाण: व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन TC निलंबित, Watch)

ट्विट

ही घटना घडली तेव्हा कासगंज ते फर्रुखाबाद जाणारी ही ट्रेन फलाट क्रमांक- 2 वर उभी होती. चप्पल घेऊन ट्रेनच्या छतावर चढलेले माकड चप्पल छतावरच ठेऊन पळून गेले. त्याच चप्पलच्या मोहाने हा तरुण छतावर चढला होता. प्राप्त माहितानुसार, कासगंज स्टेशनवर मृत्यूमुखी पडलेला तरुण हा रेल्वेचा व्हेंडर होता. पोलिसांनी त्याचा मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 06, 2023 04:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).