Asaram Bapu (PC - ANI)

Asaram Interim Bail Extended: बलात्कार प्रकरणात (Rape Case) दोषी ठरलेल्या आसारामला राजस्थान उच्च न्यायालयाकडून (Rajasthan High Court) दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने आसारामला 30 जूनपर्यंत अंतरिम जामीन (Interim Bail) मंजूर केला आहे. आसारामच्या वकिलांनी त्यांच्या उपचारांसाठी अंतरिम जामिनाचा कालावधी वाढवण्यासाठी याचिका दाखल केली होती, जी न्यायालयाने मंजूर केली. त्याचवेळी पीडितेने हा जामीन रद्द करण्याची मागणी केली होती. सध्या आसारामवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उच्च न्यायालयाने जामिनाची मुदत वाढवली -

आसारामच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना, उच्च न्यायालयाच्या दुहेरी खंडपीठाने त्यांना 30 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. यापूर्वी 2 एप्रिल रोजीही सुनावणी झाली होती, ज्यामध्ये न्यायमूर्ती दिनेश मेहता आणि न्यायमूर्ती विनीत कुमार माथूर यांच्या खंडपीठाने आसारामला दिलासा देण्यास नकार दिला होता. पण आता न्यायालयाने आसारामच्या जामिनाची मुदत वाढवली आहे. (हेही वाचा -Asaram Bapu Ads in Navi Mumbai: दिल्ली मेट्रोनंतर आता नवी मुंबईत झळकल्या बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम बापूच्या जाहिराती; तातडीने कारवाई करण्याची मागणी)

न्यायालयाच्या अटींचे उल्लंघन -

आसारामच्या प्रवचनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यावरून असे सिद्ध झाले की त्याने न्यायालयाच्या अटींचे उल्लंघन केले आहे. यानंतर न्यायालयाने आसारामच्या वकिलाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या अटींचे पालन करण्यात आले आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रतिज्ञापत्र मागितले. यानंतर 7 एप्रिल रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली. (हेही वाचा - Asaram Bapu Granted Interim Bail: बलात्कारी आसाराम बापू याच्या अंतरिम जामीनास मुदतवाढ, तीन महिने तुरुंगाबाहेर राहण्यास मुभा)

गेल्या वेळी आसारामला अंतरिम जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही अटी घातल्या होत्या ज्यामध्ये अनुयायांना गटात न भेटणे, सार्वजनिक सभांना संबोधित न करणे, माध्यमांशी बोलू नये आणि त्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या 3 पोलिसांचा खर्च उचलणे समाविष्ट होते. तथापि, आसारामच्या प्रवचनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, त्यांच्या अंतरिम जामिनाची मुदत वाढविण्यात अडचणी निर्माण झाल्यानंतर हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले.