राम राम बोलण्यास नकार दिल्याने महिलेचे कपडे फाडण्याचा प्रयत्न; मद्यधुंद आरोपी तरुणांना अटक
प्रातिनिधिक प्रतिमा | (File photo)

मागील काही महिन्यात जय श्री राम (Jai Shree Ram) बोलण्यास नकार देणाऱ्यांना मारहाण झाल्याची, जीवे मारल्याची उदाहरणे ताजी असताना राजस्थान (Rajasthan) मधील अलवर (Alwar) परिसरात असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. मद्यधुंद अवस्थेत दोन तरुणांनी सार्वजनिक ठिकाणी एका जोडप्याला राम राम म्हणायला सांगितले पण या जोडप्याने नकार दिल्याने या तरुणांनी जोडप्यासोबत असभ्य वर्तन करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर यातील महिलेचे  कपडे फाडण्याचा प्रयत्न करेपर्यंत या तरुणांची मजल गेली. याबाबत माहिती मिळताच आजूबाजूच्या जमावानी एकत्र येऊन संबंधित तरुणांना जबर मारहाण केली. यातीलच एकाने पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि पोलिसांचे पाचारण होताच या तरुणांना त्यांच्या हवाली करण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, शनिवारी अलवर येथील सेंट्रल बस स्थानकाच्या जवळच हा सर्व प्रकार घडला. शनिवारी रात्री उशिरा हरयाणाला जाण्यासाठी हे जोडपे बस स्थानकात आले होते, त्यांच्यासोबत एक लहान मुलं सुद्धा होते. बस पकडण्यापूर्वी जवळच्याच हॉटेल मध्ये जेवत असताना हा सर्व प्रकार घडला. दारूच्या नशेत असलेल्या राजवंश भारद्वाज आणि सुरेंद्र भाटिया यांनी सुरुवातीला जोडप्याला राम म्हणण्यास सांगितले पण त्या दोघांकडे लक्ष न देताच त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच महिलेचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करून, तिच्या पतीला देखील मारहाण केली. यावेळी जोडप्याने आरडाओरडा केल्याने आजूबाजूच्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि या नशेच्या अवस्थेतील तरुणांना चांगलाच चोप दिला.

पश्चिम बंगाल: 'जय श्री राम' म्हणायला नकार दिल्याने मुस्लिम तरुणाला धावत्या ट्रेन मधून बाहेर फेकले

दरम्यान, या जोडप्याने पोलिसांकडे याबाबत रीतसर तक्रार नोंदवली असून पोळी याप्रकरणी तपास करत आहेत. तूर्तास दोन्ही आरोपी हे पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्यावर तपासनानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.