राजस्थानच्या (Rajasthan) कोटा (Kota) येथून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एका जोडप्याने एका 22 वर्षीय तरुणाला कैदेत ठेवले आहे. असे सांगितले जात आहे की हा बंदीवान तरुण या दाम्पत्याचा पुतण्या आहे. या व्हिडिओमध्ये तरुणाला केवळ बंदी बनवूनच ठेवले नाही तर, त्याला मारहाणही करण्यात आली आहे. याउपर या महिलेने त्याला लघवी पिण्यास भाग पाडले आहे. महिलेच्या पतीने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कोटा पोलिसांनी आरोपी दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेमागचे कारण अद्याप उघड झालेले नाही. पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.
कोटाचे अतिरिक्त एसपी प्रवीण जैन यांनी सांगितले, ‘व्हायरल झालेला व्हिडिओ शहरातील अनंतपुरा भागात राहणाऱ्या तरुणाचा आहे. त्याला एका जोडप्याने बंदी बनवून ठेवले होते. हे जोडपे या तरुणाचे काका-काकी असल्याचे दिसत आहे. या तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला ज्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर त्या महिलेने त्या तरुणाला तिची लघवी पिण्यास भाग पाडले. महिलेचा पती होमगार्डमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणात, आता आरोपी जोडप्यावर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ 14 सप्टेंबरचा असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंतच्या पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे समोर आले आहे की, बंदी बनवून ठेवलेल्या तरुणावर त्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. प्रथमदर्शनी हे प्रकरण अवैध संबंधांशी संबंधित असल्याचे मानले जात आहे. अनंतपुरा पोलीस स्टेशन या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. (हेही वाचा: Chhattisgarh Rape Case: छत्तीसगडमध्ये 14 वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार, पोलिसांनी 3 आरोपींना घातल्या बेड्या)
पीडित तरुणाच्या मोठ्या भावाने सांगितले, जगपुरा गावात राहणाऱ्या त्याच्या नातेवाईकांनी त्याच्या भावाला त्यांच्या घरी बोलावून बंदी बनवून ठेवले. नंतर त्याचे हात-पाय बांधून रात्रभर आपल्या घरात ठेवले. भावाच्या तक्रारीनंतर आता पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.