कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल (Rahul Gandhi) गांधी सोमवारी देशाच्या अर्थव्यवस्थेवर (Indian Economy) भाष्य करत एक व्हिडिओ प्रसिद्ध करणार आहेत. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी अर्थव्यवस्थेच्या विविध पैलूंवर चर्चा करतील. राहुल गांधी यांनी एका ट्विटमध्ये याबाबत माहिती दिली. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी एका ट्विटमध्ये लिहिले की, ‘मोदी सरकारने (Modi Government) भारतीय अर्थव्यवस्था कशी नष्ट केली याविषयी माझी व्हिडिओ मालिका प्रदर्शित होणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता माझ्या सर्व सोशल मीडिया चॅनेलवर हे व्हिडिओ उपलब्ध होतील.’ या ट्वीटसोबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये राहुल गांधी यांनी उदाहरण म्हणून, नोटबंदी, जीएसटी व लॉक डाऊनचा उल्लेख केला आहे.
कॉंग्रेसने याबाबत ट्वीट करत या शृंखलेला ‘अर्थव्यवस्था कि बात राहुल गांधी के साथ’ (Arthvyavastha Ki Baat, Shri Rahul Gandhi ke saath) असे नाव दिले आहे. राहुल गांधींनी यापूर्वीही अनेक व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत. कोरोनाच्या काळात राहुल गांधी व्हिडिओद्वारे लोकांपर्यंत आपली मते पोहचवत आहेत. सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठवत ते लोकांशी संवाद साधत आहेत. व्हिडिओ मालिकेत राहुल गांधी वेगवेगळ्या भागातील लोकांशी आणि समस्यांच्या निराकरणावर विचारमंथन करतील. (हेही वाचा: संसद अधिवेशनापूर्वी काँग्रेसमध्ये हालचाल; जयराम रमेश, गुलाम नबी आजाद, आनंद शर्मा यांच्याकडे महत्वाची जबाबदारी)
राहुल गांधी ट्वीट -
Watch my video series on how the Modi Govt has destroyed Indian economy.
First video tomorrow at 10am on all my social media channels.
देखिए मेरी वीडियो श्रृंखला कि मोदी सरकार ने भारतीय अर्थव्यवस्था को कैसे नष्ट किया।
मेरे सभी सोशल मीडिया चैनलों पर पहला वीडियो कल सुबह 10 बजे। pic.twitter.com/AZBhObLxop
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 30, 2020
राहुल गांधींनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाला लक्ष्य केले. ते म्हणाले की, जेईई-एनईईटी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत चर्चा करणे अपेक्षित आहे, तर पंतप्रधान 'खेळण्यांवर चर्चा' करत आहेत. रविवारी पंतप्रधान मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांनी खेळण्यांविषयी भाष्य केले. यापूर्वी राहुल गांधींनी फेसबुक वादावरून मोदी सरकारवर निशाणा साधला होता. राहुल गांधी यांनी एका ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘अमेरिकेच्या टाईम मासिकाने व्हॉट्सअॅप-भाजपमधील संबंध उघडकीस आणले आहेत. 40 कोटी भारतीय व्हॉट्सअॅपचा वापर करतात आणि आता व्हॉट्सअॅपला त्यातूनहि पैसे हवे आहेत. यासाठी मोदी सरकारची मान्यता आवश्यक आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर भाजपची पकड आहे.’