
लोकसभा निवडणूकांची घोषणा झाल्यापासून प्रत्येकच पक्ष आपल्या मतदारांना खूष करण्यासाठी आश्वासनाचा पाऊस पाडत आहे. देशातल्या सर्वात जास्त लोकसभेच्या जागा असलेल्या उत्तर प्रदेशात आयोजित सभेमध्ये राहुल गांधींनी एक आश्वासन दिलं. अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांची पगार दुप्पट करण्याचा शब्द त्यांनी दिला आहे. त्यासाठी काँग्रेसला सत्तेत पाठवा, असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी युवकांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, भारत सरकारकडे 30 लाख पदं रिक्त आहेत. काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा आम्ही या जागा भरु आणि बेरोजगारी दूर करु असे देखील राहुल गांधी यांनी म्हटले. (हेही वाचा - Lok Sabha Election: भाजपचे लोक संविधान आणि लोकशाही नष्ट करण्यात मग्न; राहुल गांधीची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टिका)
यावेळी जातीनिहाय जनगणनेवरुन राहुल गांधींनी भाजपावर निशाणा साधला. जातीनिहाय जनगणना हा भारताचा एक्स-रे आहे. तेव्हाच कळेच की देशात कोणत्या वर्गाचे किती लोक आहेत. परंतु जेव्हा मी हा मुद्दा मांडला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे लोक विरोधात उभे राहिले. परंतु आमचं सरकार आल्यानंतर आम्ही जातीनिहाय जनगणना करु, त्यामुळे कुणाची किती भागिदारी आहे, हे कळेल.
मोदी सरकारला फक्त गर्भश्रीमंतांचीच चिंता आहे. भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची युती आणि काही मूठभर अब्जाधीश मंडळींमुळे देशातील लोकशाही आणि राज्यघटनेला मोठा धोका निर्माण झाला आहे. या देशातील दलित, आदिवासी आणि गरीब यांच्यासाठी राज्यघटना आणि लोकशाही या दोनच गोष्टी सर्वस्व असल्याचे मोदी यांनी म्हटले.