Rahul Gandhi On Media: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधीत उद्योगपतींचे प्रसारमाध्यमांवर नियंत्रण, राहुल गांधी यांचा घणाघात
Rahul Gandhi | (Photo Credits: Twitter/ANI)

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी प्रसारमाध्यमांवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, माझे भाषण प्रसारमाध्यमांमध्ये दिसत नाही कारण प्रसारमाध्यमांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासी संबंध असलेल्या 2-3 मोठ्या उद्योगपतींचे नियंत्रण आहे. त्यामुळे विरोधक म्हणून आता मी प्रसारमाध्यमांमध्ये व्यक्तही होऊ शकत नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी हे मेघालय विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान रॅलीला संबोधीत करताना बोलत होते. राहुल गांधी यांची एक संबा शिलॉंगमधील मलकी मैदानावरही पार पडणार आहे.

राहुल गांधी यांनी संसदेत उपस्थित केलेल्या अदानींच्या मुद्द्यावरुनही पुन्हा एकदा भाष्य केले. राहुल गांधी म्हणाले, संसदेत म्हणाले, मी पंतप्रधानांना त्यांच्या अदानीसोबतच्या संबंधांबद्दल विचारले. त्यासंदर्भात मी एक चित्र देखील दाखवले. ज्यामध्ये पंतप्रधान अदानींच्या विमानात बसले आहेत आणि पंतप्रधान मोदी हे त्यांचे स्वतःचे घर असल्यासारखे आराम करत आहेत. पंतप्रधान मोदींनी यासंदर्भात एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. (हेही वाचा, Sanjay Raut On Rahul Gandhi: राहुल गांधींचा जलवा कायम राहिला तर 2024 मध्ये सरकार बदलेल; संजय राऊत यांचा दावा)

ट्विट

नरेंद्र मोदी यांच्यावरील हल्ला कायम ठेवत राहुल गांधी यांनी म्हटले की, अदानींच्या मुद्द्यावरुन विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलेच नाही. उलट मलाच प्रश्न केला माझे अडणाव गांदी का आहे. नेहरु का नाही? मी संसदेमध्ये मुद्देसूद भाषण केले. पण, तुमच्या लक्षात आलेच असेल माझे भाषण आपल्याला कुठेच दिसले नाही. पण, पंतप्रधान कोठेही बोलत असतील तर त्यांचे भाषण प्रसारमाध्ये पूर्ण वेळ टेलिव्हीजनवर दाखवतात.