Rahul Gandhi | (Photo Credit: ANI/Twitter)

कोरोना व्हायरस (Coronavirus) आपत्ती काळात श्रमिक स्पेशल ट्रेन (Shramik Special Trains) सरकारने सुरु केल्या. या ट्रेनच्या माध्यमातूनही स्थलांतरीत मजूरांच्या प्रवास भाड्यातून भारतीय रेल्वेने नफा कमवला, असा आरोप करत काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष, वायनाडचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकार हे गरिब विरोधी सरकार आहे. या सरकारने 9 जुलै अखेर अपत्ती काळातही तब्बल 429.90 कोटी ( Rs 429.90 crore) रुपयांची कमाई केल्या असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन केंद्र सरकारव हल्ला चढवला आहे. आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणतात देशातील जनतेवर कोरोना आजाराचे सावट असताना केंद्र सरकार त्यातही नफा मिळवू पाहात आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटसोबत एक वत्तपत्रातील वृत्ताची प्रतिमाही सोबत जोडली आहे.

कोरोना व्हायसस संकटामुळे संपूर्ण भारतभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. या काळात स्थलांतरित मजूरांना त्यांच्या गावी पोहोचता यावे यासाठी विविध राज्यांच्या मागणीवरुन केंद्र सरकारने भारतीय रेल्वेच्या मदतीने श्रमिक स्पेशल ट्रेन सुरु केल्या. या ट्रेन साधारण 1 मे 2020 पासून सुरु झाल्या. प्राप्त आकडेवारीनुसार आतापर्यत 4,496 इतक्या ट्रेन सोडण्यात आल्या. या ट्रन 1 मे 2020 ते 9 जुलै अखेर सोडण्यात आल्याची माहिती आहे. या ट्रेनमधून सुमारे 6.5 दक्षलक्ष स्थलांतरीतांनी प्रवास केल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेसाठी खोटी प्रतिमा निर्माण केली' राहुल गांधी यांचा घणाघातील आरोप)

गेल्या काही काळापासून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला जोरदा लक्ष्य केले आहे. विविध मुद्द्यांवरुन राहुल गांधी केंद्र सरकारला प्रश्न विचारत धारेवर धरत आहेत. भारत-चीन संबंध, भारत चीन सीमेवर चीनच्या कुरापती, चीनची घुसखोरी, कोरोना, स्थलांतरीत मजुरांचे प्रश्न अशा एक ना अनेक मुद्द्यांवरुन राहुल गांधी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत.