राहुल गांधी यांची पुन्हा पीएम नरेंद्र मोदींवर टीका- 'पँगाँग तलावाजवळ चीनने भारताच्या भूमीवर कब्जा केला', शेअर केले सॅटेलाइट फोटो (Watch Video)
Rahul Gandhi (Photo Credits: ANI/File)

लडाख (Ladakh) च्या गलवान खोऱ्यात (Galwan Valley) 20 सैनिक शहीद झाल्यापासून, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सरकारवर प्रश्नांचा भाडीमार सुरु केला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वक्त्यव्यावर प्रश्नचिन्ह उभे करत, राहुल गांधी यांनी सांगितले आहे की, भारतभूमीवर चीनने (China) कब्जा केला आहे. याबाबत राहुल यांनी एक ट्वीट केले आहे, ज्यामध्ये त्यांनी सॅटेलाइट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये पँगाँग तलावाजवळ (Pangong Lake) चीनने भारताच्या भूमीवर कब्जा केला असल्याचे दिसत आहे.

राहुल गांधी यांनी ट्वीट केले आहे- 'पंतप्रधान म्हणाले- कोणीही देशात घुसले नाही, नाही कोणी आमच्या भूमीवर कब्जा केला. पण उपग्रह फोटोंमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की, चीनने पँगाँग लेक जवळ भारत भूमीवर कब्जा केला आहे.' शुक्रवारी पीएम मोदींनी सर्वपक्षीय बैठकीत (All Party Meeting) सांगितले होते की, आपल्या सीमेवर कोणतीही घुसखोरी झाली नाही. तसेच आमची कोणतीही पोस्ट कोणीही हस्तगत केलेली नाही. पंतप्रधानांच्या या विधानानंतर राहुल गांधी सतत त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. नरेंद्र मोदी खरेच 'सरेंडर मोदी' आहेत, असे म्हणत राहुल गांधींनी रविवारी त्यांच्यावर टीका केली.

पहा व्हिडिओ -

आता राहुल गांधींनी आज तक वृत्त वाहिनीची एक व्हिडिओ क्लिप ट्विट केली आहे, ज्यामध्ये उपग्रह प्रतिमांमधून असे दिसून आले आहे की चीनी सैन्याने पँगाँग तलावाजवळील भारतीय प्रदेश ताब्यात घेतला आहे. व्हिडिओमध्ये इंडिया टुडेचे संचालक राहुल कंवल यांनी स्पष्ट केले की, लडाखच्या गलवान व्हॅली भागात चिनी लोकांनी भारतीय भागात प्रवेश केला नाही, परंतु पीएलएच्या सैनिकांनी तलावाच्या फिंगर 4 भागापर्यंत तळ बांधले आहे. (हेही वाचा: Cyber Attack: या 'Email Id' पासून सावधान! चीन भारतावर सायबर हल्ला करण्याच्या तयारीत)

दरम्यान, 15 व 16 जून रोजी भारत आणि चीन च्या सैनिकांमध्ये झटापट झाली होती. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते. यासोबतच चीनचे 43 लोक जखमी झाले होते व त्यातील काहींचा मृत्यूही झाला होता.