Puppy Dies Fallen From High-Rise: इमारतीच्या टेरेसवरुन फेकल्याने कुत्र्याच्या पिल्लाचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
Noida Dog Case | Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

ग्रेटर नोएडा पोलिसांनी (Greater Noida Police) एका अल्पवयीन मुलाविरोधात कायदेशीर कारवाई सुरु केली आहे. एका उच्चभ्रू इमारतीच्या गच्चीवरुन कुत्र्याच्या लहान पिल्लाला (Noida Dog Case) या मुलाने कथीतरित्या खाली फेकले. ज्यामुळे या पिल्लाचा मृत्यू झाला. पोलिसांकडे प्राप्त तक्रारीवरुन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरु केला आहे. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्याचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये लहान मुलगा कथीतरित्या कुत्र्याचे पिल्लू फेकून देताना दिसत आहे.

पीपल फॉर ॲनिमल्स स्वसंसेवी संस्थेकडून दखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या घटनेची दखल घेत पीपल फॉर ॲनिमल्स (पीएफए) या स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंसेवकाने पोलिसांमध्ये तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी प्राथमिक माहिती अहवाल म्हणजेच एफआयआर दाखल केला आहे. संस्थेच्या स्वयंसेवकाने दिलेल्या तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की, टॉवर आर-14, एव्हेन्यू गौर सिटी-2 मध्ये राहणाऱ्या अंदाजे 9-10 वर्षे वयोगटातील मुलाने कुत्र्याच्या पिल्लाला इमारतीवरून बेदरकारपणे फेकून दिले.

घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळते की, अंदाजे नऊ ते दहा वयोगटातील एक मुलगा कुत्र्याचे लहान पिल्लू इमारतीच्या गच्चीवरुन खाली जमीनीच्या दिशेने फेकत आहे. या वेळी तिथे एक प्रौढ व्यक्ती देखील आहे. कुत्र्याचे पिल्लू जीवाच्या अकांताने ओरडत असतानाही हा मुलगा अशा प्रकारचे कृत्य करतो आहे. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीमध्ये अल्पवयीन मुलाची न्यायालयासमोर हजर राहण्याची आणि त्याच्या मानसिक स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी मानसिक मूल्यांकनाची मागणी करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या घटना समाजामधील प्राण्यांप्रती केल्या जाणाऱ्या क्रूर वर्तनाच्या कृत्यात भर घलते, असा दावाही करण्यात आला आहे. (हेही वाचा, New Mumbai Shocker: कोपरखैरणे येथे मद्यधुंद व्यक्तीचा कुत्र्यावर बलात्कार; घटना कॅमेऱ्यात कैद (Video))

'लहान मुलाच्या वर्तनाचा अभ्यास होणे आवश्यक'

पीएफए स्वयंसेविका सुरभी रावत यांनी सोशल मीडिया आणि प्रौढांच्या वागणुकीचा मुलांवर होणारा प्रभाव अधोरेखित केला आणि तरुणांमधील अशा प्रवृत्तींकडे लक्ष देण्याची तातडीची गरज व्यक्त केली. एक पीएफए विश्वस्त अंबिका शुक्ला यांनी मुलाने केलेल्या कृतीचा मागोवा घेण्याची आवश्यकता आहे. खासकरुन त्याने हे वर्तन कोणत्या परिस्थितीत केले. त्यापाठिमागे त्याने तसा काही विचार बनवला होता काय. त्याने हे वर्तन नेमके कोणत्या कारणामुळे केले, याबाबत चौकशी होणे आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या. (हेही वाचा, New Mumbai Shocker: कोपरखैरणे येथे मद्यधुंद व्यक्तीचा कुत्र्यावर बलात्कार; घटना कॅमेऱ्यात कैद (Video))

राज्यसभेचे खासदार साकेत गोखले यांनी प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करण्याच्या एका सदस्याच्या खाजगी विधेयकाचा दाखला देत, प्राणी क्रूरतेचा सामना करण्यासाठी भक्कम कायद्याची गरज अधोरेखित केली. गोखले यांच्या प्रस्तावित कायद्याच्या दुरुस्तीचे उद्दिष्ट प्राण्यांच्या क्रूरतेसाठी ₹1 लाखांपर्यंत दंड आणि एक वर्षापर्यंतच्या कारावासापर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. जे प्राण्यांचे अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या वाढत्या मागणीचे प्रतिबिंबित करते.