सोशल मीडियावरील जगप्रसिद्ध अॅप टिकटॉकचे (TikTok) प्रचंड युजर्स आहेत. या अॅप मधून आपली कला एका व्हिडिओच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहचते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून टिकटॉकच्या व्हिडिओमुळे काही जणांना आपला जीव गमावावा किंवा गंभीर दुखापत झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यातच आता भर पडली असून एक टिकटॉकवर व्हिडिओ बनवण्यासाठी चक्क तरुणाला झाडाच्या फांदीला लटकवले असल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना पंजाब हरियाणामधील असून तरुणाच्या गळ्यात दोरी लावून फाशीवर चढवल्यासारखे त्याला झाडाला लटकवण्यात आले होते.
नरवाना गावातील एका तरुणाला व्हिडिओ बनवण्यासाठी झाडाला लटकवणे ही अत्यंत चुकीची बाब आहे. तरीही त्याच्या गळ्यात दोरी बांधून सुळावर चढवल्यासारखे झाडाच्या फांदीला लटकवले गेले. मात्र सुदैवाने दोरी तुटून तरुण खाली पडल्याने त्याचा जीव वाचला आहे. या प्रकरणी तरुणाच्या मामाने हा प्रकार केला असून त्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(गोरखपूर: TikTok व्हिडिओ बनवण्यासाठी दोन तरुणांची पूलावरुन उडी, एकजण बेपत्ता)
पोलिसांनी याबाबत अधिक माहिती देत असे म्हटले की, भाच्याला फोनकरुन शेतात मामाने बोलावले. त्यावेळी मामाने भाच्याला टिकटॉकचा व्हिडिओ बनवण्यासाठी त्याला झाडाच्या फांदीवर लटकण्यास सांगितले. त्यानंतर मामाने त्याचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. मात्र दोरी झाडाच्या फांदीपासून कमकुवत होत तुटल्याने भाचा खाली पडला. गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीने असे म्हटले आहे की. भाच्याची तब्येत बिघडली असून त्याला श्वास घेणे मुश्किल झाले आहे. तर सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुसऱ्या बाजूला मामाला भाच्याचा जीव घ्यायचा होता म्हणून त्याला झाडाच्या फांदीला लटकण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात येत आहे.