पुणे (Pune) शहरातील वाघोली (Wagholi) परिसरात एका गोडावूनला लागलेल्या आगीत सिलिंडरचा स्फोट झाला. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली मात्र, तोपर्यंत जीवित आणि वित्त हाणी होऊन गेली होती. अग्निशिमन दलाच्या जवानांनी तातडीने राबवलेल्या मदत आणि बचाव कार्यामुळे अधिक हानी होणे टळले. आगीमध्ये चाल सिलिंडरचा स्फोट झाला. मात्र, तत्पूर्वी आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. आग नियंत्रणात आली असली तरी ती पूर्णपणे विझवण्याचे काम अद्यापही सुरुच आहे. या कामाला काहीसा वेळ लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, पुणे शहरातील वाघोली परिसरात शुक्रवारी रात्री 11.45 च्या सुमारास एका मंडप साहित्याच्या गोडावूनला आग लागली. 'शुभम सजावट' असे या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडावूनचे नाव आहे. आग लागताच गोडावूनमध्ये असलेल्या चार सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य राबवले.

ट्विट

मोठा अर्थ थोडक्यात टळला

धक्कादायक म्हणजे या आगीत तीन कामगारांचा मृत्यू झाला. दरम्यान, या गोडावूनच्या बाजूलाच सिलिंडरचेही मोठे गोडावून होते. ज्यात सुमारे 400 सिलिंडर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अग्निशमन दलाला या सिलिंडर गोडावूनबद्दल कल्पना असल्याने त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले. ज्यामुळे पुढील अनर्थ टळला.