Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्याचे उद्याचे हवामान कसे? पहा हवामान अंदाज!
Image Credit : Pixabay

Pune weather prediction, June28: आज 27 जून 2024 रोजी पुण्यातील तापमान 25.33 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान  23.42 °C ते  27.1 °C दर्शवतो. आठवडाभर विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. मुंबई,पुणे तसेच मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर काही दिवस मुसळधार पाऊस झाला परंतु त्यानंतर पावसाने अनेक ठिकाणी दांडी मारल्याचे दिसून आले. मात्र पावसाने आता परत जोरदार हजेरी लावली आहे.अरबी समुद्रात मान्सून सक्रिय होत असून पुढील दोन दिवस महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत राज्यात मान्सून पूर्णपणे  सक्रिय होण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरीत आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पुणे, सातारा येथे विविध ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.तर पुण्यात ही गेल्या काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला व पिंपरी चिंचवड सारख्या भागात पावसामुळे खूप नुकसान झाले ,भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, पुण्यात यावर्षी जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.आता पुण्यात उद्याचे हवामान कसे असतील ह्यासाठी हवामान खात्याने पुण्यातील उद्याचे हवामान कसे ह्याच अंदाज लावला आहे. हेही वाचा: Mumbai Weather Forecast For Tomorrow:मुंबईत उद्याचे हवामान कसे?जाणून घ्या हवामान अंदाज!

पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला असून सुमारे तासाभरात 114.5 मिमी पावसाची नोंद पर्जन्यमापकाने केली आहे. दुपारी 4 ते 5.15 वाजेपर्यंत पाऊस पडला, असे भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दमदार पावसामुळे पिंपरी-चिंचवडमधील अनेक भागात पाणी साचले होते. भटनागर, मिलिंद नगर आणि आनंद नगर भागात सर्वाधिक नुकसान झाले. अनेक भागांतील रस्ते इतके जलमय झाले होते की वाहनधारकांना आपली वाहने रस्त्यावर सोडून पाणी ओसरण्याची वाट पहावी लागली. जोरदार पावसामुळे पिंपरी-चिंचवडमधील अनेक भागात पाणी साचले.