Pulwama Attack Site | (Photo Credits: PTI)

Pulwama Attack 3rd Anniversary: आजच्या दिवशी 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-कश्मीर येथील पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्याला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर जवळजवळ 2600 जवानांना घेऊन जाणाऱ्या 78 बसमध्ये सीआरपीएफचे जवान होते. पुलवामा येथे जवान पोहचले असता तेव्हाच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने येणाऱ्या एका कारने सीआरपीएफच्या ताफ्यासोबत चालणाऱ्या वाहनाला धडक दिली. समोर आलेल्या एसयुवी जशी ताफ्याला धडकली असता मोठा स्फोट झाला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 शूरवीर जवान शहीद झाले.

विस्फोट ऐवढा मोठा होता की, काही वेळ धुराच्या लोटांमुळे काही कळत नव्हते. परंतु जेव्हा सत्य देशाने पाहिले तेव्हा रडू आवरले नाही. कारण पुलवामात दहशतावद्यांकडून सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता आणि त्यामध्ये 40 जवान शहीद झाले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली होती. आजही ही घटना आठवली तरी अंगावर काटा उभा राहतो. तर सोशल मीडियात ही युजर्सकडून पुलवामातील हल्ल्याप्रकरणी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.(Jammu & Kashmir: दहशतवाद्यांचा पुलवामा येथील पोलिस चौकीवर ग्रेनेड हल्ला, दोन पोलिस जखमी)

Tweet:

Tweet:

Tweet:

Tweet:

Tweet:

दरम्यान, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. काश्मीरमधील 30 वर्षांचा पुलवामा हल्ला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी 350 किलो आयईडी वापर केल्याचे तपासात उघड झाले. याच्या प्रत्युत्तरात भारतानेहवाई मर्यादेचे उल्लंघन केले आणि पाकिस्तानमधील बालाकोट येथे हवाई हल्ला केला होता.