Mann Ki Baat: लाल किल्ला हिंसा, कोरोना लसीकरण याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली 'मन की बात'
File Image of Narendra Modi addressing nation via Mann Ki Baat | (Photo Credits: PTI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज 2021 या नववर्षात पहिल्यांदाच 'मन की बात केली' (Mann Ki Baat) . या कार्यक्रमात त्यांनी शेतकरी आंदोलनादरम्या प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान लाल किल्ल्यावर (Red Fort Violence) तिरंग्याचा अपमान झाल्याबाबत दु:ख व्यक्त केले. ही घटना पाहून देश व्यथित झाल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले. आपल्याला येणारा काळ नवी आशा आणि नवनिर्मितीने भरावा लागणार आहे. गेल्या वर्षी आपण संयम आणि साहसाचा परिचय दिला. या वर्षी आपणअदिक कष्ट करु. स्वत:ला सिद्ध करु. पंतप्रधानांनी कोरोना लसिकरणाबाबतही (Corona Vaccination) भाष्य केली.

पंतप्रधान मोदी यांनी कोरोना व्हायरस लसीकरणाबाबत बोलताना सांगितले की, भारताने कोरोना व्हायरस लढाईत एक निश्तित स्थान प्राप्त केले आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत हिंदुस्तान जगभरात एक उदाहरण म्हणून पुढे आला आहे. आता आपली लसीकरण मोहिमही एक मोहिम बनली आहे. भारतात आज जगातील सर्वात मोठी कोरोना मोहिम राबवत आहे. (हेही वाचा, कृषी कायद्यासंदर्भात मी शेतकऱ्यांपासून एका फोन कॉलच्या अंतरावर : पंतप्रधान नरेंद्र मोदी)

पंतप्रधानांनी पुढे म्हटले की, आपण जगभरात सर्वात मटी लसीकरण मोहिम राबवत आहोत. यासोबत अधिक वेगाने अधिकाधिक लोकांना लस देत आहोत. केवळ 15 दिवसांमध्ये भारताने आपल्या जवळपास 30 लाखांहून अधिक कोरोनायोध्यांचे कोरोना लसीकरण केले आहे. इतक्या क्षमतेने लसीकरण करणयासाठी अमेरिकेसारख्या विकसीत देशाला 18 तर इंग्लंडला 36 दिवस लागले होते.

पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, मेड इन इंडिया वॅक्सीन आज देशाच्या आत्मनर्भरतेचे प्रतिक आहे. भारतासाठी ही एक आत्मगौरवाचे प्रतिक ठरले आहे. कोरोना लसिरकणाच्या मोहिमेच्या सुरुवातीसोबत कोरोना संकटाला वर्षपूर्ती होत आहे. आपल्या लढाईला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. नव्या वर्षात जानेवारी महिन्यादरम्यान साजऱ्या करण्यात आलेल्या सण उत्सव यांसह अन्य घटना आणि कार्यक्रमांचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले, या सर्वांमध्ये दिल्ली येथे 26 जानेवारीला तिरंग्याचा अपमाण झाल्यामुळे देश दु:खी झाला. 23 जानेवारी हा स्वतंत्र्य सेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्मदिवस आहे. हा दिवस 'पराक्रम दिवस' म्हणून साजरा करण्यात येणार आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.